Rohan Bopanna : रोहन बोपान्नाने मनात येणारे निवृत्तीचे विचार कसे केले दूर?

Rohan Bopanna : ४३ व्या वर्षी दुहेरीतील अव्वल स्थान गाठलेला रोहन बोपान्ना आपल्या या यशाचं श्रेय कणखर मानसिक आरोग्याला देतो

128

भारताचा दुहेरीतील दिग्गज खेळाडू रोहन बोपान्नाने (Rohan Bopanna) या आठवड्यात इतिहास रचताना दुहेरीतील अव्वल स्थानावर झेप घेतली. तर मॅथ्यू एबडनच्या साथीने त्याने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुषांच्या दुहेरीचं विजेतेपद पटकावलं.  ४३ व्या वर्षी ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात मोठा व्यावसायिक टेनिसपटू ठरला आहे. तर मागच्या अख्ख्या शतकात फक्त दोन टेनिसपटूंनी वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर अव्वल स्थान आपलंसं केलं आहे.

ही कामगिरी केल्यानंतर पहिलं वाक्य त्याने उच्चारलं ते होतं, ‘हा प्रवास सोपा नव्हता. यात खूप मोठा त्याग आहे.’ हळूहळू मीडियाशी संवाद साधताना रोहन बोपान्नाने (Rohan Bopanna) हा त्याग कुठला आणि इतके दिवस टिकून राहण्यासाठी नेमकं काय केलं हे उलगडून सांगितलं आहे. त्याच्याच म्हणण्यानुसार, प्रत्येक स्पर्धेपूर्वी आता निवृत्त व्हावं का, असा विचार करतच तो स्पर्धेत उतरला आहे.

(हेही वाचा Iran : आता इराणमध्ये पाकिस्तानी नागरिकांच्या हत्या; 9 जणांना गोळ्या झाडून केले ठार)

‘वय वाढतं तसं शरीर साथ देत नाही. गेल्याचवर्षी पहिले पाच महिने मी एकही स्पर्धा जिंकू शकलो नव्हतो. गुडघा त्रास देत होता. अशावेळी प्रत्येक क्षणी वाटायचं, बस झालं. पण, आपल्यात अजून काहीतरी बाकी आहे, ही भावना कधी मला सोडून गेली नाही. त्यामुळे खेळत राहिलो. दुखापत बरी व्हावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. आणि खेळत राहिलोॉ,’ असं बोपान्ना (Rohan Bopanna) म्हणाला.

ऑस्ट्रेलियन ओपन पूर्वी तो क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. आणि यापूर्वी २०१३ मध्ये ही कामगिरी त्याने केली होती. आणि नवीन ग्रँडस्लॅम स्पर्धा समोर होती. अशावेळी ही स्पर्धा खेळून क्रमवारीत आणखी पुढे जायचं त्याने ठरवलं. यावेळी मॅथ्यू एबडनच्या साथीने त्याने स्पर्धेत शेवटपर्यंत मजल मारली आणि त्याचं क्रमवारीतील अव्वल स्थानाचं स्वप्न पूर्ण झालं. ‘ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत दोनदा प्रवेश करूनही विजेतेपद मिळवलं नव्हतं. शिवाय क्रमवारीतही वर जायचं होतं. मनाला उभारी दिली. योगा, पर्यायी उपचार पद्धती आणि मनाचा कणखरपणा यामुळेच निवृत्तीचे विचार मागे टाकू शकलो,’ असं शेवटी बोपान्नाने (Rohan Bopanna) बोलून दाखवलं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.