प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन : टपाल विभागाच्या चित्ररथावर होणार महिला सशक्तीकरणाचे दर्शन

85

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात विविध मंत्रालये आणि विभाग नाविन्यपूर्ण संकल्पनांसह आपापले चित्ररथ सादर करत असतात. या वर्षी भारतीय टपाल विभागाने देखील अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने रंगीबेरंगी चित्ररथाची रचना केली आहे. ‘भारतीय टपाल विभाग : महिला सशक्तीकरणाच्या निश्चयाची 75 वर्षे’ ही टपाल विभागाच्या या वर्षीच्या चित्ररथाच्या देखाव्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतीय टपाल विभागाच्या या चित्ररथाची मध्यवर्ती संकल्पना आणि आरेखन टपाल विभागाचे सचिव विनीत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून या कार्यात मुंबई विभागाच्या मुख्य पोस्ट मास्तर स्वाती पांडे आणि इतर काही अधिकाऱ्यांनी सर्जनशील सूचनांचे योगदान दिले आहे.

चित्ररथाच्या समोरच्या भागात, भारतीय पोस्ट पेमेंट बँक तसेच टपाल खात्यातील बचत खात्यांच्या 50% खातेदार महिला आहेत, यातून महिलांचे आर्थिक समावेशन अधोरेखित करताना आणि आदर्श महिला कर्मचारी नियोक्ता विभाग म्हणून भारतीय टपाल विभाग प्रसिद्ध आहे. त्यासह भारतीय टपाल विभागाचा आधुनिक चेहेरा आणि सशक्त संपर्क सेवा ठळकपणे दाखविण्यासाठी या चित्ररथात ‘संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित कार्यालये’ दर्शविण्यात आली आहे.

(हेही वाचा बाळासाहेबांनी सेनेला युतीत सडवले का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल)

काय दिसणार या चित्ररथावर?

  • या चित्ररथावर, तंत्रज्ञान आणि परंपरा यांचे उत्तम मिश्रण असलेल्या टपाल विभागाच्या कार्याची कल्पना येण्यासाठी आणि विभागाचा आधुनिक चेहेरा दर्शविण्यासाठी, एका हातात डिजिटल साधन आणि दुसऱ्या हातात पोस्टमनची पारंपरिक पिशवी घेतलेली पोस्टवूमन दर्शविण्यात आली आहे.
  • तिच्या बाजूला, भारतीय जनतेची टपाल विभागावरील अढळ श्रद्धा दर्शविणारी, सर्वत्र आढळणारी उंच, लाल टपाल पेटी उभी आहे. टपाल विभागाच्या कार्यात दशकानुदशके जी स्थित्यंतरे आली आहेत तिचा अंदाज येण्यासाठी पोस्टवूमनच्या शेजारी पोस्टमनचे प्राथमिक रूप असलेला पूर्वीच्या काळातील डाकिया अथवा हरकारा उभारण्यात आला आहे.
  • काही काळापूर्वी संपलेल्या “पंतप्रधानांना 75 लाख पोस्टकार्डे अभियाना”ची देखील प्रतिमा येथे आहे. या चित्ररथावर हजारो ग्राहकांचा विश्वास असलेल्या स्पीड पोस्ट, ई-वाणिज्य, एटीएम कार्ड्स यांसारख्या सेवा उभारण्यात आल्या आहेत तसेच समाजाप्रती बांधिलकी जपणारी दिव्यांग-स्नेही रँप सुविधेने सुसज्जित असलेली टपाल कार्यालये दर्शविण्यात आली आहेत.
  • चित्ररथाच्या मागच्या भागात, पंतप्रधानांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या ‘सुकन्या समृद्धी योजने’वर भर देणाऱ्या श्रीनगर येथील तरंगत्या टपाल कार्यालयाचा नमुना देखील ठेवण्यात आला आहे.
  • लिंगसमानतेच्या दिशेने टाकलेले पाऊल आणि त्यासाठीचा टपाल विभागाचा निश्चय दर्शविणारी ‘संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित कार्यालये’ देखील या चित्ररथात उभारण्यात आली आहेत.
  • टपाल कार्यालयाच्या त्रिमितीय टेबलांवर आपण ग्राहकांची आधार जोडणी, पोस्टल एटीएम सुविधा अशा सेवा देणाऱ्या टपाल विभागाच्या महिला अधिकाऱ्यांना बघितल्यावर टपाल विभागाच्या महिला सशक्तीकरणाप्रती असलेल्या निश्चयाची जाणीव होते.
  • भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचा विचार केला तर या बँकेच्या सुमारे 50% ग्राहक (2.24 कोटी) महिला आहेत आणि यातील 98% खाती महिलांच्या घरी जाऊन उघडण्यात आली आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.