Unseasonal Rain : झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – गिरीश महाजन

भारतीय हवामान खात्याकडून येत्या ५ मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

138
Unseasonal Rain
Unseasonal Rain : झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - गिरीश महाजन

शनिवार २९ एप्रिल पासून मुंबईसह इतर उपनगर परिसरात ढगाळ वातावरण बघायला मिळत असून रविवार ३० एप्रिल रोजी सकाळपासून मुंबईतील अनेक भागात अवकाळी (Unseasonal Rain) पावसाने हजेरी लावली आहे. तर भारतीय हवामान खात्याकडून येत्या ५ मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील हवामान हे संमिश्र स्वरूपाचे पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा – Unseasonal Rain : नालासोपारा, दादरसह मुंबईतील अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट (Unseasonal Rain) देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यतील शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही पहा – 

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी (Unseasonal Rain) व गारपिटीची धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. जिल्ह्यातील सुमारे ८ हजार ७१७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली. या शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ७५ लाख ९८ हजार एवढा निधी १० एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयान्वये मंजुरही केला आहे. सदर मदत बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्याची कार्यवाही चालू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.