RBI Monetary Policy : सलग ११ वेळा व्याजदर जैसे थे!

96

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आज 8 एप्रिल 2022 रोजी त्यांचे नवीन पत धोरण जाहीर केले आहे. बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. RBIने रेपो दर 4% तर रिव्हर्स रेपो दर देखील 3.35 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. यंदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. सलग अकराव्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

 ( हेही वाचा : भर उन्हाळ्यात निघणार घामाच्या धारा! महाराष्ट्रावर लोडशेडींगची टांगती तलवार )

रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे

आरबीआय गर्व्हनर दास यांनी सांगितले की, भू-राजकीय संघर्षाचा परिणाम अनेक अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारतासाठीदेखील हा आव्हानात्मक काळ आहे. देशात महागाई दर वाढण्याचाही अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा मान्सून सरासरी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारातील घडामोडी पाहून धोरणात बदल करण्यात येईल असेही दास यांनी सांगितले. शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे ठेवले आहेत.

युक्रेन-रशिया युद्धामुळे अस्थिरता 

रेपो रेट 4 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.5 टक्क्यांवरच ठेवला आहे. आर्थिक वर्षात जीडीपी 7.2 टक्के राहण्याची शक्यता आहे. 2023 साठीचा अंदाजित जीडीपी 7.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर घसरला आहे. येत्या काही दिवसात महागाईची झळ बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच एप्रिल-जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती अंदाजे सरासरी 100 डॉलर प्रति बॅरल राहण्याचा अंदाज आहे. कोव्हिड, युक्रेन-रशिया युद्धामुळे तयार झालेल्या अस्थिरतेमुळे येत्या काळात भारताला महागाईची झळ पोहोचणार असून, सोबतच भारताच्या विकासाचा वेग देखील मंदावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.