BEST Recruitment 2023: BMC अंतर्गत चालक, वाहक पदांच्या 12,350 जागेवर महाभरती? BEST ने स्पष्टच सांगितले…

811

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत बेस्ट (BEST) ही कंपनी कार्यरत असून बेस्ट मंबई शहर व मंबई उपनगर , ठाणे व पालघर भागामध्ये सार्वजनिक बस वाहतूक सुविधा व विज पुरवठा करते. बेस्टमध्ये सध्या 15 हजार पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र बेस्टमधील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने, कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यामुळे बेस्टमध्ये वाहक, चालक पदांकरीता तब्बल 12,350 जागेवर महाभरती करण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवस चांगल्याच व्हायरल होत आहे.

(हेही वाचा – Indian Railways: चुकूनही ट्रेनमध्ये ‘या’ 4 गोष्टी घेऊन जाऊ नका; नाहीतर तुरूंगात जावं लागेल आणि…)

बेस्टमध्ये काही पदे हे नियमित वेतनश्रेणीवर तर काही पदे हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत .यापैकी चालक पदांच्या 5,320 तर वाहक पदांच्या 5,000 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बेस्ट मध्ये होणारी महाभरती किती खरी आहे किंवा खोटी आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? दरम्यान, 29 डिसेंबर गुरूवारी रोजी बेस्टकडून अधिकृतरित्या एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहेत. यामध्ये बेस्टने या मेगाभरतीबाबत स्पष्टपणे खुलासा केला आहे.

काय म्हटले आहे BEST च्या प्रसिद्धीपत्रकात?

बेस्ट उपक्रमामध्ये चालक-वाहक पदांसाठी भरती असल्याबाबत अफवा असल्याचे बेस्टकडून सांगण्यात येत आहे. https://jobsanhita.com/best-driver-vahak-recruitment-2023/ या लिंकद्वारे बेस्ट उपक्रमामध्ये चालक आणि वाहक पदांच्या १२,३५० जागांकरिता महाभरती असल्याबाबत वृत्त व्हॉट्सअप या समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहे.

letter 1

परंतू, हे वृत्त खोटे असून अशा प्रकारच्या कोणत्याही भरतीबाबत ब्रेस्ट उपक्रमाने अधिकृतरित्या कोणत्याही वृत्तपत्राला, वृत्तवाहिनीला किंवा वेब पोर्टलला कळविलेले नाही. त्यामुळे कोणीही अशा वृत्ताबाबत सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय वर दिलेल्या लिंकवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे. केवळ अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकच्या आधारे कोणीही अर्ज केल्यास किंवा त्याबाबत फसवणूक झाल्यास त्याला बेस्ट उपक्रम जबाबदार असणार नाही, असेही बेस्टने स्पष्ट म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.