ब्रिटीश राजवटीला विरोध करण्यासाठी पुस्तके विकून शस्त्रे विकत घेणारे Ram Prasad Bismil

पंडित राम प्रसाद 'बिस्मिल' यांचा जन्म ११ जून १८९७ रोजी शहाजहापूर येथे झाला.

99
ब्रिटीश राजवटीला विरोध करण्यासाठी पुस्तके विकून शस्त्रे विकत घेणारे Ram Prasad Bismil
ब्रिटीश राजवटीला विरोध करण्यासाठी पुस्तके विकून शस्त्रे विकत घेणारे Ram Prasad Bismil

पंडित राम प्रसाद ‘बिस्मिल’ (Ram Prasad Bismil) यांचा जन्म ११ जून १८९७ रोजी शहाजहापूर येथे झाला. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या एक प्रमुख क्रांतिकारी होते. त्यांना ब्रिटीश सरकारने वयाच्या ३० व्या वर्षी फाशी दिली होती. मैनपुरी कट, काकोरी कट अशा अनेक क्रांतिकारी चळवळींमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्यही होते.

राम प्रसाद हे कवी, अनुवादक, बहुभाषिक, इतिहासकार आणि साहित्यिक देखील होते. बिस्मिल हे त्यांचे उर्दू टोपणनाव होते. या व्यतिरिक्त ते राम आणि अज्ञात या टोपण नावाने देखील लिहित होते. १९१६ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी क्रांतिकार्यात उडी घेतली. आपल्या ११ वर्षांच्या क्रांतिकारी जीवनात त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि स्वतः प्रकाशित केली. ती पुस्तके विकून मिळालेल्या पैशातून त्यांनी शस्त्रे विकत घेतली आणि ती शस्त्रे ब्रिटिश राजवटीला विरोध करण्यासाठी वापरली. त्यांच्या हयातीत अकरा पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी बहुतांश पुस्तके सरकारने जप्त केली आहेत.

(हेही वाचा – Railway line Tree Cutting : महापालिकेकडून करून घेतली झाडांची मोफत छाटणी, आता रेल्वे करणार कंत्राटदाराची नियुक्ती)

बिस्मिल (Ram Prasad Bismil) यांनी लखनौजवळील काकोरी येथे एका ट्रेनमध्ये सरकारी खजिना लुटण्याची एक अत्यंत जबरदस्त योजना आखली. ही घटना ९ ऑगस्ट १९२५ रोजी घडली. दहा क्रांतिकारकांनी सहारनपूर-लखनौ पॅसेंजर ट्रेन काकोरी येथे थांबवली. या कारवाईत जर्मन बनावटीच्या माऊजर C96 सेमी ऑटोमॅटिक पिस्तुलांचा वापर करण्यात आला.

यानंतर ४० हून अधिक क्रांतिकारकांना अटक करण्यात आली होती. मात्र केवळ १० जणांनी या कार्यात भाग घेतला होता. या घटनेशी पूर्णपणे संबंध नसलेल्या व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले. पुढे काहींना सोडून देण्यात आले. १८ महिन्यांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर राम प्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, रोशन सिंग आणि राजेंद्र नाथ लहिरी यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. बिस्मिल यांना १९ डिसेंबर १९२७ रोजी गोरखपूर तुरुंगात, अशफाकउल्ला खान यांना फैजाबाद तुरुंगात आणि ठाकूर रोशन सिंग यांना नैनी अलाहाबाद तुरुंगात फाशी देण्यात आली. लाहिरी यांना दोन दिवसांपूर्वी गोंडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. (Ram Prasad Bismil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.