Ram Mandir Pran Pratishtha: भूकंप, वादळापासून राम मंदिर कसे सुरक्षित आहे? तज्ज्ञांनी दिली माहिती

मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने मंदिराच्या सुरक्षिततेबाबत उत्तम माहिती दिली आहे.

174
Ram Mandir Pran Pratishtha: भूकंप, वादळापासून राम मंदिर कसे सुरक्षित आहे? तज्ज्ञांनी दिली माहिती
Ram Mandir Pran Pratishtha: भूकंप, वादळापासून राम मंदिर कसे सुरक्षित आहे? तज्ज्ञांनी दिली माहिती

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध स्तरावर नियोजन सुरू आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून (Ram Mandir Pran Pratishtha) श्रीरामाचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. देशभरात सर्वच ठिकाणी उत्साहाचे वातावरण आहे. मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने मंदिराच्या सुरक्षिततेबाबत उत्तम माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Bombay High Court : सार्वजनिक सुट्टी ही कायद्याला धरूनच; न्यायालयाने फेटाळली विद्यार्थ्यांची याचिका )

एल अँड टीचे मंदिर आणि परकोटा प्रभारी अंकुर जैन यांनी याविषयी असे सांगितले आहे की, हे मंदिर भूकंप प्रतिरोधक आहे. हे मंदिर स्थापत्त्यशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या बांधकामाकरिता उत्कृष्ट दर्जाचे ग्रॅनाइट, सँडस्टोन आणि संगमरवर वापरण्यात आले आहे तसेच उत्तम दर्जाचे सिमेंट आणि चुन्याचा वापर केला आहे. जर आपण आय. एस. कोड पाहिला तर तो क्षेत्र क्रमांक 3 अंतर्गत येतो, परंतु त्याची रचना क्षेत्र क्रमांक 4 नुसार केली गेली आहे. सी. बी. आर. आय. रुडकीने त्याच्या पायाच्या रचनेची तपासणी केली आहे. तज्ज्ञांनी मंदिराचे नक्षीकाम आणि सुशोभिकरण ग्रॅनाइटच्या दगडांनी करण्याचा सल्ला दिला आहे.

मंदिराच्या मजबुतीकडे विशेष लक्ष 

  • मंदिराची उभारणी आणि मजबुतीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. मंदिर हजारो वर्षे सुरक्षित राहण्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच उच्च दर्जाच्या साहित्यावरही तज्ज्ञांनी विशेष लक्ष दिले आहे. मंदिर उभारणीकरिता देशातील सर्वोत्तम साहित्याचा वापर केला आहे.
  • सर्वोच्च दर्जाचे दगड कर्नाटक आणि राजस्थानमधील बन्सी पहारपूर येथे मिळतात. येथील गुलाबी दगड मंदिरात बनवले गेले आहेत. मंदिराचा पाया ६० फूट खोल खालून घातला आहे. ६० फूट खोल कॉंक्रिटचे खडक उभारून बांधकाम केले जात असल्यामुळे मोठ्या वादळातही मंदिरावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा मंदिर ट्रस्टने केला आहे.
  • भारतातील सर्वोत्तम संगमरवरचा मंदिर बांधकाम उभारणीकरिता वापर केला आहे. याशिवाय राजस्थानातील पहारपूरच्या बलवा लाल दगडापासून खांब तयार करण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.