Rajiv Dixit : सामाजिक कार्यकर्ते राजीव दीक्षित, ज्यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकलले नाही

188
Rajiv Dixit : सामाजिक कार्यकर्ते राजीव दीक्षित, ज्यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकलले नाही
Rajiv Dixit : सामाजिक कार्यकर्ते राजीव दीक्षित, ज्यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकलले नाही

राजीव दीक्षित (Rajiv Dixit) यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील अतरौली तहसीलमधील नाह गावात झाला. राधेश्याम दीक्षित हे त्यांचे वडील आणि मिथिलेश कुमारी त्यांच्या मातोश्री. त्यांनी अलाहाबाद येथून बीटेक तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमटेक आणि फ्रान्समधून पीएचडी प्राप्त केली.

राजीव दीक्षित यांनी भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि फ्रान्सच्या दूरसंचार केंद्रात काही काळ काम केले. राजीव दीक्षित हे प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते होते. ते भारत स्वाभिमान ट्रस्टचे राष्ट्रीय सचिव होते. १९९० च्या दशकात त्यांनी “आझादी बचाओ आंदोलन” ची स्थापना केली. ही संस्था प्रामुख्याने भारतीय उद्योगांचे संरक्षण करत होती. त्यांनी विदेशी कंपन्यांचा विरोध केला आणि आयुर्वेदाचा प्रचार केला. असे म्हटले जाते की यामुळे त्यांनी अनेक शत्रू निर्माण करुन ठेवले होते.

दीक्षित (Rajiv Dixit) यांनी भारतीय करप्रणालीचे विकेंद्रीकरण करण्याची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे होते की सध्याची व्यवस्था ही नोकरशाही भ्रष्टाचाराचे मुख्य कारण आहे. त्यांनी असा दावा केला की कर महसुलाच्या ८० टक्के रक्कम राजकारणी आणि नोकरशहांच्या पगारासाठी वापरली जाते. त्याचबरोबर त्यांनी भारतात शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा-Chhagan Bhujbal यांच्या येवला दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध)

दुर्ग येथील व्याख्यान झाल्यानंतर ते भारत स्वाभिमान आंदोलनाचे स्थानिक अधिकारी दया सागर यांच्यासोबत भिलाईला जात होते. प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटले आणि घाम फुटला. दया सागर यांच्या राहत्या घरी ते बाथरूममध्ये पडले. सुरुवातीला त्यांनी डॉक्टरांकडे न जाण्याचा आग्रह धरला. बाबा रामदेव यांच्या फोननंतर त्यांना प्रथम भिलाईच्या सेक्टर ९ रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्यांना बीएसआर अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले.

डॉ. दिलीप रतनानी यांच्या म्हणण्यानुसार, रात्री १ ते २ च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. १ डिसेंबर रोजी शवविच्छेदन न करता त्यांचा मृतदेह हवाई मार्गाने अलिगडला पाठवण्यात आला. त्यांचे बंधू प्रदिप दीक्षित आणि बाबा रामदेव यांनी त्यांना मुखाग्नी दिला. पुढे २०१९ मध्ये पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले. पण अजूनही त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले नाही.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.