पुण्यातील नवले पुलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाही. याठिकाणी मंगळवारी पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
अचानक ब्रेक झाले फेल
उतारावर कंटेनर मागे सरकल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मुंबईहून सातार्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर उताराच्या दिशेने पाठीमागे सरकत गेला. यामध्ये पाठीमागे असणाऱ्या काही वाहनांना त्याची धडक बसली. यात काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अद्याप मृतांचा अथवा जखमींचा नेमका आकडा समोर आला नाही. परंतु या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याचे सांगितले जातं आहे.
( हेही वाचा :शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची बाधा )
अपघातांची मालिका सुरुच
यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. वडगाव परिसरात ब्रेक फेल झाल्याने एका भरधाव ट्रकने चार वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झाली नाही. 21 ऑक्टोबर 2021 रोजी नवले पुल परिसरातील सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले होते.
Join Our WhatsApp Community