पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुस-या कार्यकाळात अयोध्या मंदिरासह इतर प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धाराकडे लक्ष दिले आहे. उज्जैन ते काशी आणि अयोध्या ते अबुधाबी अशाप्रकारे देशविदेशात त्यांनी भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार केला किंवा नवीन मंदिरे बांधली. नुकतेच त्यांनी उज्जैन महाकालेश्वर मंदिरात महाकाल लोकचे उद्घाटन केले. तर अबुधाबीतही पहिले भव्य हिंदू मंदिर उभे राहिले आहे. पाहूया कुठे कोणत्या मंदिराचे काम सुरु आहे.
अयोध्या मंदिराच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने
लालकृष्ण अडवाणी यांनी 1980 मध्ये राममंदिराच्या प्रश्नावरुन रथयात्रा काढली, तेव्हा नरेंद्र मोदींनीही त्यात सहभाग घेतला होता. ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या मंदिराचा शीलान्यास केला. मंदिराचे काम जवळपास अर्धे पूर्ण झाले आहे.
काश्मीरमध्ये मंदिरांचे पुनर्निर्माण
- जम्मू- काश्मीरमध्ये सुमारे 1842 हिंदू मंदिरे आहेत. त्यापैकी केवळ 212 सुस्थितीत आहेत. कलम 370 रद्द केल्यानंतर प्रसिद्ध शीतलनाथ मंदिर तब्बल 31 वर्षांनी 2021 मध्ये खुले झाले.
- या मंदिरांचा होणार जिर्णोद्धार- मार्तंड मंदिर, रघुनाथ मंदिर, शंकरगौरीश्वर मंदिर, पांद्रेथन मंदिर, अवंतीस्वामी आणि अवंतीस्वरा मंदिर
केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार
- उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर हे पंतप्रधान मोदी यांचे सर्वांत आवडते धार्मिकस्थळ आहे. पंतप्रधान झाल्यावर मोदी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार हाती घेतला.
- या प्रकल्पांतर्गत इशानेश्वर मंदिर, आस्था चौकात ओंकारची मूर्ती, आदी गुरु शंकराचार्य यांची समाधी, शिव उद्यान आणि वासुकी तलावाची निर्मिती यांचा समावेश होता.
सोमनाथ मंदिर
गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर इतिहासात वारंवार परकीय आक्रमणे झाली. मोहंमद गझनी ते औरंगजेबापर्यंत अनेकाने हे मंदिर अनेकदा तोडले, असा दावा केला जातो. ऑगस्ट 2021 मध्ये मोदी यांनी पार्वतीमाता मंदिराचे भूमिपूजन, दर्शनबारी आणि प्रदर्शन केंद्राचे लोकार्पण या तीन प्रकल्पांचे उद्घाटन केले.
( हेही वाचा: भारतीय चलनाचा ‘असा’ आहे रंजक इतिहास )
विदेशातील मंदिरे
- 2019 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी बहरीन येथील 200 वर्षे जुन्या मंदिराच्या कामासाठी लाखो डाॅलरचा प्रकल्प सुरु केला. बहरीनमध्ये मनामा येथे तीन मजली श्रीनाथजी मंदिर उभारण्यात येत आहे.
- 2018 मध्ये मोदी यांनी अबूधाबीत पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन केले. यूएई सरकारने मंदिरासाठी जमीन दिली.