PM Vishwakarma Scheme : कारागीरांच्या कौशल्य विकासासाठी असलेल्या विश्वकर्मा योजनेचा फायदा कसा मिळवाल?

योजना जाहीर झाल्यापासून एका महिन्यात ऑक्टोबर २०२३ पर्यंत १.४ कारागीरांनी या योजनेसाठी अर्ज केला. 

172
PM Vishwakarma Scheme : कारागीरांच्या कौशल्य विकासासाठी असलेल्या विश्वकर्मा योजनेचा फायदा कसा मिळवाल?
  • ऋजुता लुकतुके

देशातील छोट्या प्रमाणावर उद्योग करणारे कारागीर आणि हस्तकला कारागीर यांना कौशल्य विकासाची संधी मिळावी यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Scheme) सुरू केली. पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) या योजनेचं उद्घाटन केलं होतं. १८ प्रकारच्या कारागीरांना या योजनेत सामावून घेण्याची घोषणा तेव्हा मोदी (PM Narendra Modi) यांनी केली होती. सुतारकाम, चर्मकार, पाथरवट, गवंडीकाम याबरोबरच कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला कारागीर अशा लोकांनाही योजनेत सहभागी होता येईल. (PM Vishwakarma Scheme)

या योजनेत सहभागी होणाऱ्या कारागीरांना विश्वकर्मा योजने (PM Vishwakarma Scheme) अंतर्गत काही फायदे मिळणार आहेत. ते असे आहेत,

ओळख : पीएम विश्वकर्मा योजनेचं ओळखपत्र आणि एक पत्रक या कारागीरांना मिळेल.

कौशल्य विकास : कुठलीही कारागिरी शिकण्यासाठी मूलभूत शिक्षणासाठी ७ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम तर कौशल्य विकासासाठी १५ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम करता येणार. या दिवसांत ५०० रुपये दर दिवशी असा शैक्षणिक भत्ताही मिळणार.

सामुग्रीसाठी मदत : कारागिरीचं प्रशिक्षण सुरू केल्यावर सुरुवातीला त्यासाठी लागणारी सामुग्री विकत घेण्यासाठी १५,००० रुपयांपर्यंतचं साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत

कर्ज पुरवठा : कारागिरीचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लोकांना उद्योग सुरू करण्यासाठी सरकारी योजनेतून ३ लाखांपर्यंतचं कर्ज ते ही ५ टक्के या ठरावीक व्याजदराने उपलब्ध होणार. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रथम १ लाखाचं कर्ज. आणि या कर्जाची वर्षभर नीट परतफेड केली तसंच कर्जाचं खातं योग्यरित्या सांभाळलं तर एका वर्षाने आणखी २ लाख रुपयांचं असं मिळून ३ लाख रुपयांचं कर्ज मिळणार. कर्जाची मुदत १२ किंवा १८ महिन्यांची.

डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन : स्वत:चा उद्योग सुरू केल्यावर डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर केल्यास, महिन्यातील प्रत्येक व्यवहारामागे १ रुपयांचा परतावा मिळणार. पहिल्या १०० आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येकी १ रुपया मिळणार.

विपणनासाठी मदत : कारागीरांनी बनवलेला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारकडून मदत केली जाते. मालाच्या दर्जाचं प्रमाणपत्र देण्याबरोबरच मालाचं ब्रँडिंग आणि माल ई-कॉमर्स माध्यमांपर्यंत पोहोचवायलाही सरकारकडून मदत केली जाईल. तसंच पुढे जाऊन कारागीरांची गणना उद्योजकांमध्ये करून त्यांना मध्यम व छोट्या उद्योजकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ देण्यासाठीची मदतही सरकारकडून केली जाईल. (PM Vishwakarma Scheme)

विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

विश्वकर्मा योजनेचा (PM Vishwakarma Scheme) फायदा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि चार पायऱ्यांमध्ये ही प्रक्रिया तुम्हाला करायची आहे.

यातील पहिला टप्पा आहे तो आधारकार्ड आणि मोबाईल फोनच्या पडताळणीचा. तुमचं आधार कार्डाची माहिती ऑनलाईन फॉर्ममध्ये भरल्यावर तुम्हाला नोंदणी केलेल्या मोबाईल फोनवर एक ओटीपी येईल. तो बरोबर भरला तर तुमची ओळख पटून तुम्ही मुख्य प्रक्रिया सुरू करू शकाल. त्यापूर्वी एकदा तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ती ही ऑनलाईन होते.

दुसऱ्या पायरीवर, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या कारागिरीसाठी तुम्ही अर्ज करत आहात ते निश्चित करून त्याप्रमाणे एक ऑनलाईन फॉर्म भरून द्यावा लागेल. तुमची बाकीची माहिती, आतापर्यंत घेतलेलं शिक्षण अशी माहितीही यात भरायची आहे.

तर तिसऱ्या पायरीवर, तुमची नोंदणी पूर्ण होऊन तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेचं डिजिटल ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळेल.

चौथ्या आणि शेवटच्या पायरीवर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या कारागिरीसाठी अर्ज करू शकता. आणि प्रशिक्षणही सुरू करु शकता. (PM Vishwakarma Scheme)

(हेही वाचा – Lewis Hamilton to Ferrari : फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन मर्सिडिज सोडून फेरारीकडे का गेला?)

विश्वकर्मा योजनेची पात्रता काय?

पीएम विश्वकर्मा योजनेचा (PM Vishwakarma Scheme) फायदा करून घेण्यासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत,

व्यक्ती १८ वर्षांवरील आणि भारतीय नागरिक असावी.

कारागीर व्यक्ती छोट्या प्रमाणावर उद्योग करणारी आणि त्यावर उपजीविका करणारी हवी.

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळेल.

योजनेसाठी नोंदणी करताना ती व्यक्ती त्याच व्यवसायात असली पाहिजे.

सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबीय या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत. (PM Vishwakarma Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.