एक ऐतिहासिक पाऊल! परदेशातून ‘या’ पुरातन वस्तू भारताच्या स्वाधीन

172

ऑस्ट्रेलियाने भगवान शिव, भगवान विष्णू आणि जैन परंपरा इत्यादींशी संबंधित 29 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत. ज्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली आहे. या पुरातन वस्तू वेगवेगळ्या कालखंडातील असून या पुरातन वस्तूंचे सहा गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी सोमवारी दिली.

Modi 3 1

ऑस्ट्रेलियातील पुरातन वस्तूंची मोदींकडून पाहणी

एक ऐतिहासिक पाऊल उचलत ऑस्ट्रेलियाने 29 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत. या पुरातन वस्तू अतिशय प्राचीन असून भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिक आहे. ‘शिव आणि त्यांचे शिष्य’, ‘शक्तीची उपासना’, ‘भगवान विष्णू आणि त्यांची रूपे’, जैन परंपरा, चित्रे आणि शोभेच्या वस्तू या सहा श्रेणीतील आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील पुरातन वस्तूंची पाहणी केली आहे.

 

dolon

(हेही वाचा – शिवतीर्थावर महाराजांच्या साक्षीने राज ठाकरेंनी दिली मनसैनिकांना ‘ही’ शपथ )

Modi 7

मोदींच्या कार्यकाळात अनेक प्राचीन वस्तू भारतात परतल्या

या पुरातन वस्तूंमध्ये प्रामुख्याने खडक, संगमरवरी, कांस्य, पितळ अशा विविध प्रकारच्या साहित्यापासून बनवलेली शिल्पे आणि कागदावरची चित्रे आहेत. या पुरातन वस्तू राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात अनेक प्राचीन वस्तू भारतात परत आणल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी सोमवारी त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष स्कॉट मॉरिसन यांच्याशी ऑनलाइन संभाषण करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.