नागालॅंडमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत नाही? मंत्री तेमजेन इमना अलॉंग यांनी केली पुष्टी!

183
काय? नागालॅंडमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत नाही? मंत्री तेमजेन इमना अलॉंग यांनी केली पुष्टी!
काय? नागालॅंडमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत नाही? मंत्री तेमजेन इमना अलॉंग यांनी केली पुष्टी!

प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे किती नुकसान होत आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नसल्याने आपल्या निसर्गासाठी अपायकारक मानले जाते. प्लास्टिकमुळे पृथ्वीवरच्या प्राण्यांना तर धोका आहेच पण याशिवाय समुद्रात राहणाऱ्या जलचरांनासुद्धा मोठी हानी होते. यासाठी सरकारने प्लास्टिक बॅग्स बंद केल्या होत्या आणि कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते.

आपले शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अनेक एनजीओ कार्यरत असतात. ते लोकांना प्लास्टिक वापरल्याने होणाऱ्या नुकसानाविषयी जागृत करत असतात. समुद्रसफाई करताना कितीतरी टन प्लास्टिक कचरा बाहेर काढला जातो. हा कचरा नष्ट होऊ शकत नसल्याने पर्यावरणाचे खूप नुकसान होते.

३ जुलैला इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे साजरा केला गेला. याचे औचित्य साधून नागालँडचे मंत्री तेमजेन इमना अलॉंग यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा नागालँडच्या एका भाज्यांच्या दुकानजवळ थांबून आपल्याला तिथे कशाप्रकारे भाज्या केळीच्या पानांत बांधून ठेवल्या आहेत ते दाखवतो आहे. या व्हिडीओवरून आपल्याला समजते की नागालँडमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत नाही. तिथे फक्त ऑरगॅनिक पिशव्यांचा वापर केला जातो.

हा व्हिडिओ नक्की पाहा

(हेही वाचा – पाकिस्तानी तरुणीचे भारतात येणे संशयास्पद; देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?)

या व्हिडीओला 30,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत. तसेच सोशल मीडियावर या गोष्टीचं लोक खूप कौतुक करत आहेत. अशाप्रकारे ऑरगॅनिक पॅकिंग करणं हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे असे लोकांचे म्हणणे आहे. तसेच म्हणूनच भारताच्या ईशान्येकडील राज्ये इतक्या निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत यात शंका नाही असेही काही जणांचे म्हणणे आहे. देशातील सर्व राज्यात अशाप्रकारचे बदल घडवून आणले पाहिजेत असेही काही जण सांगत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.