अपघातात अपंगत्व आलेल्या पीडिताला 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्या; उच्च न्यायालयाचे आदेश

82

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या अपंगत्व आलेल्या पीडित व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. गंभीर अपघातामुळे आलेले कायमचे अपंगत्व आणि त्यामुळे सहन करावा लागत असेलला सांसारिक, शारिरिक आणि मानसिक त्रास पाहता पीडित व्यक्तीच्या नुकसान भरपाईत वाढ होणे गरजेचे आहे, अस नमूद करुन मुंबई उच्च न्यायालयाने 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

धातू कापणीचे काम करणारे याचिकाकर्ते योगेश पांचाळ हे 29 नोव्हेंबर 2004 रोजी दुचाकीवरुन मुलुंडमधील सोनापूर बस स्थानकाजवळून जात असताना, मागून येणा-या एका डंपरने त्यांना धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पांचाळ यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले.

या अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी पांचाळ यांनी मोटार वहन अपघात दावा लवादाकडे अर्ज केला. लवादाने त्यांना 48 लाख रुपयांची नुकसान भरपाई 7.5 टक्के व्याजाने देण्याचे निर्देश दिले. मात्र, पांचाळ यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्याने या निर्णयावर पांचाळ यांनी असमाधान दाखवत मुंबई उच्च न्यायालयात नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याबाबत याचिक दाखल केली होती.

( हेही वाचा: वसईत फटाक्यांमुळे एकाच दिवसात 6 ठिकाणी आग लागल्याच्या घटना )

काय म्हणाले उच्च न्यायालय?

न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान, याचिकाकर्त्याचे वैयक्तिक आयुष्यात संपूर्णत: बदल झाले असून, त्यांचा कमेरपासून पायापर्यंतचा भाग निकामी झाला आहे. तसेच त्यांच्या शारिरिक, मानसिक त्रासाचा त्यांच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम झाला आहे. पिता म्हणून त्यांच्या मुलांच्या प्रति जबाबदा-या आहेत. या सर्व बाबी लक्षात घेत, उच्च न्यायालयाने नुकसानभरपाईच्या रकमेत अतिरिक्त 64 लाख 86 हजार 715 रुपयांची वाढ केली. तसेच, येणा-या काळातील वैद्यकीय खर्चाची 23 लाख रुपयांची रक्कम वगळता न्यायालयाने पांचाळ यांची याचिका योग्य ठरवली आणि त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.