
भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे सहावे अवतार होते. परशुराम म्हणजे परशू (कुऱ्हाड) धारण करणारा. भगवान परशुरामांना भगवान शिवाकडून परशू मिळाला होता, म्हणूनच त्यांना परशुराम या नावाचे ओळखले जाते. परशुरामांचा जन्म महर्षी जमदग्नी आणि आई रेणुका यांच्या पोटी झाला. (Parashurama Jayanti)
भगवान परशुराम यांनी प्रदोष काळात अवतार घेतला होता. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला प्रदोष काळात भगवान परशुरामांची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. यंदा २९ एप्रिल रोजी परशुराम जयंती साजरी केली जाणार आहे. संध्याकाळी ५:३१ वाजता सुरू होऊन ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० एप्रिल रोजी दुपारी २:१२ वाजता संपेल. भगवान परशुराम हे शक्ती, न्याय आणि धर्माचे प्रतीक मानले जातात. परशुराम जयंतीच्या दिवशी, भक्त भगवान परशुरामांची पूजा करतात, या दिवशी मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने धैर्य, शक्ती आणि शांती मिळते अशी भाविकांचा श्रद्धा आहे. निपुत्रिक जोडप्यांना मुले होण्यासाठी हे व्रत विशेषतः फायदेशीर ठरते. ते या दिवशी दानधर्म करण्यालाही खास महत्त्व आहे. (Parashurama Jayanti)
(हेही वाचा – Pahalgam Attack Update: पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वेच्या सुरक्षेत वाढ)
परशुराम जयंतीच्या दिवशी या मंत्राचा जप केला जातो :
ॐ ब्रह्मक्षत्राय विद्महे क्षत्रियान्ताय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।।
ॐ जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम: प्रचोदयात्।।
ॐ रां रां ॐ रां रां परशुहस्ताय नम:।।
(हेही वाचा – NCERT च्या पुस्तकांतून मोगलांचा इतिहास हद्दपार; भारतीय राजघराणी, महाकुंभ यांचा समावेश)
तुम्हाला माहिती आहे का की कलियुगात परशुराम भगवान धर्मयुद्ध करणार आहेत?
असं मानलं जातं की कलियुगात परशुराम भगवान कल्कीला शस्त्रांचे प्रशिक्षण देणार आहेत. परशुराम कल्कीसोबत कलियुगातील धार्मिक युद्धात सामील होतील. श्रीमद्भागवतानुसार, जेव्हा कलियुग त्याच्या शिखरावर आणि अंतिम मर्यादेवर असेल, तेव्हा भगवान कल्की अवतार घेतील आणि त्यांना भगवान परशुरामच शस्त्रांचे ज्ञान देतील. त्यानंतर भगवान कल्की कली नावाच्या राक्षसाचा वध करून कलियुगाचा अंत करून सत्ययुगाची स्थापना करतील. आता आजचा संदर्भ घ्यायला गेलो तर हा राक्षस कोण आहे, असं तुम्हाला वाटतं? कोणत्या वैचारिक धारणेविरुद्ध धर्मयुद्ध घडणार आहे? कदाचित अतिरेक्यांचा वध म्हणजेच राक्षसांचा वध असणार आहे. (Parashurama Jayanti)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community