भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून , बिट्स अँड बाईट्स हे डिजिटल जनजागृती माध्यम आणि बृहन्मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३, १४ आणि १५ ऑगस्ट हे तीन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत दादर येथील वनिता समाज सभागृह येथे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.
( हेही वाचा : १ लाख मुंबईकरांचा १ रुपयात ‘बेस्ट’ प्रवास!)
मुलांचे मनोबल वाढवावे
या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे दिव्यांग मुलांनी पर्यावरण स्नेही (Ecofriendly) साहित्य वापरून तयार केलेला ७५ फुटांचा तिरंगा. यामध्ये श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या दृष्टी बाधित मुलांचे योगदान आहे. दृष्टीबाधित मुलांकडून हा तिरंगा बनवण्यात आला. तसेच या मुलांकडून मल्लखांब प्रात्यक्षिकांचें सादरीकरण करण्यात आले. दिव्यांग मुलांचे आपल्या देशाप्रतिचे योगदान पाहता, मुंबईकर आणि दादरकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून, या मुलांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन ‘बिट्स अँड बाईट्स’ च्या संचालिका विद्या गोकर्णकर यांनी केले आहे