गेल्या ४ महिन्यांत महाराष्ट्रात आले १० नवे प्रकल्प

97

वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससह लागोपाठ तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. मात्र, गेल्या ४ महिन्यांत महाराष्ट्रात १० नवे प्रकल्प आल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ‘हे’ ९ प्रकल्प महाराष्ट्रात, बघा यादी)

सर्वाधिक २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प रायगडमध्ये उभारला जाणार आहे. हा आ‍‍शियातील सर्वात मोठा कागद निर्मिती उद्योग आहे. इंडोनेशियातील हा समूह भारतात पहिल्यांदाच इतकी मोठी गुंतवणूक करीत आहे. रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे या प्रकल्पासाठी तीनशे एकर जागा देण्यात आली असून, प्रकल्पाच्या मागणीनुसार अधिकची जागा देण्याचा शासनाचा मानस आहे.

सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया हा प्रकल्प नागपूरमध्ये येणार असून, ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडने रायगडमध्ये ३७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अहमदनगरमध्ये सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रीजने ६६२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, यानिमित्ताने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

पुण्यासह कोकणात सर्वाधिक प्रकल्प

– नव्या प्रकल्पांसाठी पुण्यासह कोकणाला पसंती मिळत असून, मागील चार महिन्यांत या क्षेत्रांत सर्वाधिक प्रकल्प आले आहेत.
– उपरोक्त प्रकल्पांशिवाय पुण्यात आयएफबी रेफ्रिजरेटर्स लिमिटेडने ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, रायगडमध्ये मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेडने ७५८ कोटींची गुंतवणूक केली आहे.
– त्याशिवाय वरूण बेवरजेस लिमिटेडने अहमदनगरमध्ये ७७९ कोटी, विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड सोलापूर १२६ कोटी, तर जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्सने जळगावात ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.