OnePlus Nord 4 : ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला हा फोन आहे स्वस्तात मस्त 

OnePlus Nord 4 : जुलै महिन्यात भारतात वनप्लसचा नवीन फोन लाँच होण्याची शक्यता आहे  

135
OnePlus Nord 4 : ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला हा फोन आहे स्वस्तात मस्त 
OnePlus Nord 4 : ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला हा फोन आहे स्वस्तात मस्त 
  • ऋजुता लुकतुके

चिनी कंपनी वन प्लसने अलीकडेच भारतात आपला नॉर्ड सीई४ (OnePlus Nord 4) हा अत्याधुनिक फोन लाँच केला. आपले आवडते गेम, मिम्स आणि इतर डिजिटल गोष्टी या फोनमध्ये जपून ठेवा, त्या डिलिट करू नका, अशीच या फोनची जाहिरात आहे. त्यावरून तुम्हाला फोनचा युएसपी लक्षात आलाच असेल. फोनमध्ये अगदी १ टेराबाईट पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. त्यानंतर आता वनप्लस ही चिनी कंपनी याच फोनचा मोठा भाऊ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या फोनचं नाव आहे वनप्लस नॉर्ड ४. (OnePlus Nord 4)

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन ३ चिपसेट असलेला हा फोन आहे. त्यामुळे फोनची कार्यक्षमताही जास्त आहे. (OnePlus Nord 4)

(हेही वाचा- NEET – UG Exam: नीट निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह आयएमएने केली ‘ही’ मागणी)

भारतात सिलेडॉन मार्बल आणि क्रोम कलर अशा दोन रंगांत भारतात हे फोन उपलब्ध आहेत. (OnePlus Nord 4)

फोनचा डिस्प्ले ६.७ इंच एमोल्ड डिस्प्ले आहे. तर रिफ्रेश रेट आहे १२०० हर्ट्झचा. फोनच्या मागच्या बाजूला दोन कॅमेरे आहेत. यातील प्राथमिक कॅमेरा ५० मेगा पिक्सलचा तर अल्ट्रावाईड लेन्स १६ मेगापिक्सेल क्षमतेची आहे. सेल्फी कॅमेरा ८ मेगा पिक्सेलचा आहे. कॅमेरातील लेन्स ही सोनीची आणि उच्च दर्जाची आहे. फोनची बॅटरी ही ५,००० एमएअच क्षमतेची आहे. आणि फोनबरोबर ८० वॅट क्षमतेचा वायर असलेला चार्जर कंपनीने देऊ केला आहे. फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईड १३ आहे. (OnePlus Nord 4)

(हेही वाचा- Elon Musk यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन; म्हणाले, “आता माझ्या कंपन्या भारतात…”)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फोनची किंमत ही २४,९९९ रुपयांपासून सुरू होते. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला फोन २६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. (OnePlus Nord 4)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.