आरेत बिबट्याचा पुन्हा हल्ला; दोन आठवड्यांत एकाच परिसरात हल्ला

144

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला आरेत दीड वर्षांच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री पुन्हा बिबट्याने एका माणसावर हल्ला केला. या हल्ल्यात माणसाला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु दोन्ही हल्ले हे युनिट क्रमांक १५मध्येच झाले असल्याने आतापर्यंत पकडलेल्या दोन्ही बिबट्यांनी दीड वर्षांच्या मुलीवर हल्ला केला नसून, मूळ हल्ला केलेला बिबट्या मोकाटच फिरत असल्याचे सिद्ध झाले आहे. दोन आठवड्यांत एकाच परिसरात बिबट्याने दोनदा हल्ले केले आहेत.

रविवारी रात्री साडेआठनंतर युनिट क्रमांक १५ जवळील तबेल्याबाहेरील परिसरात बिबट्याने माणसावर हल्ला केला. कुटुंबीयांनी फोन केल्याने नेटवर्कमध्ये येण्यासाठी तबेल्यातील इसम बाहेर आला. फोनवर बोलत असतानाच जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात माणसाच्या पायाजवळ बिबट्याने नख मारुन पळ काढला, असे बोलले जात आहे. हल्ल्यानंतर जवळच्याच परिसरात झुडूपात बिबट्या लपल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. दिवाळीच्या घटनेनंतर लगेचच तिस-या दिवशी सी ५५ बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी अजून एक बिबट्या जेरबंद केला गेला. जेरबंद केलेले दोन्ही बिबटे इतिका लोट या दीड वर्षाच्या मुलीवर हल्ल्यात सहभागी नव्हते, असे कॅमेरा ट्रेपमधील निरीक्षणानंतर वनाधिका-यांनी मत नोंदवले. रविवारी माणसावर हल्ला केलेल्या बिबट्या आणि दीड वर्षांच्या मुलीवर हल्ला केलेला बिबट्या एकच आहे. ही मादी बिबट्या असून, तिला पकडण्यासाठी आरेत पुन्हा पिंजरे लावण्यात आले आहेत.

( हेही वाचा: राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस : कर्करोगाची लक्षणे ओळखा! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.