Indian Air Force: C-295 मालवाहू विमानामुळे वायुदलाची ताकद वाढणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गाझियाबाद येथील हिंजन एअरबेसवर एका कार्यक्रमात हे विमान अधिकृतरित्या वायू दलाकडे सोपवलं आहे.

78
Indian Air Force: C-295 मालवाहू विमानामुळे वायुदलाची ताकद वाढणार
Indian Air Force: C-295 मालवाहू विमानामुळे वायुदलाची ताकद वाढणार

शत्रूचा सामना करण्यासाठी, स्वप्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारची लढाऊ विमाने ही सेवेत असतात. असे असतानाच C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट म्हणजेच C-295 मालवाहू वाहतूक विमान अधिकृतपणे भारतीय वायू दलात दाखल झाले. (Indian Air Force ) सी-295 मुळे भारतीय वायू दलाची ताकद आणखी वाढली आहे. सोमवारी (२५ सप्टेंबर) भारत ड्रोन शक्ती २०२३ कार्यक्रमात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

भारतीय वायू दलात ५० हून सी-295 विमाने सामील होणार आहेत. C-295 एअरक्राफ्ट भारतीय वायू दलाची ताकद वाढवण्यासाठी अधिकृतरित्या भाग बनला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गाझियाबाद येथील हिंजन एअरबेसवर एका कार्यक्रमात हे विमान अधिकृतरित्या वायू दलाकडे सोपवलं आहे. २०२६ पर्यंत एकूण 56 C-295 विमाने वायू दलात दाखल होतील. यांचा खर्च सुमारे २१,९३५ कोटी रुपये आहे. (Indian Air Force)

(हेही वाचा : Maharashtra Geet : महाराष्ट्र गीताच्या संस्कृत भावानुवादाला मिळतेय तरुणाईची पसंती)

C-295 औपचारिकपणे भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सामील झालं. टाटा आणि एयरबस डिफेन्स कंपनी या दोन कंपन्यांनी मिळून हे विमान बनवलं आहे. स्पेनमधून ६ हजार ८५४ किलोमीटरचे अंतर कापून हे विमान २० सप्टेंबरला वडोदरा येथे पोहोचले. विमान वडोदराहून टेकऑफ झाल्यानंतर आणि हिंडन एअरबेसवर पोहोचलं. या विमानाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे विमान एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील धावपट्टीवरून टेक ऑफ करू शकते आणि याच्या लँडिंगसाठी फक्त ४२० मीटर धावपट्टीची गरज आहे. यामुळे दुर्गम डोंगराळ भागात आणि बेटांवर थेट सैन्य उतरणं शक्य होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.