Israel-Hamas conflict: हमासविरोधात लढणाऱ्या FAUDA वेबसिरीजच्या क्रू मेंबरचा मृत्यू

FAUDAमध्ये काम केलेले सर्व कलाकार आणि क्रू मेंबर कधीही भरून न येणाऱ्या या नुकसानामुळे दु:खी आहेत.

75
Israel-Hamas conflict: हमासविरोधात लढणाऱ्या FAUDA वेबसिरीजच्या क्रू मेंबरचा मृत्यू
Israel-Hamas conflict: हमासविरोधात लढणाऱ्या FAUDA वेबसिरीजच्या क्रू मेंबरचा मृत्यू

इस्त्रायल आणि हमासमधील (Israel-Hamas conflict) घनघोर युद्ध अजूनही सुरूच आहे. गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू असलेल्या या युद्धात जगभरात गाजलेल्या FAUDA या वेबसीरिजच्या क्रू मेंबरचा मृत्यू झाला आहे. FAUDA वेबसीरिजच्या X अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये इस्त्रायलच्या नागरिकांसह FAUDA या वेबसीरिजच्या क्रू मेंबरसह कलाकारांचाही समावेश आहे. यापैकीच एक मातन मीर नावाच्या क्रू मेंबरचा गाझा पट्टीमध्ये हमासविरोधात लढताना मृत्यू झाला आहे.

FAUDA कुटुंबातील एक सदस्य मातन मीर यांचा गाझामध्ये युद्ध लढताना निधन झाले, अशी माहिती FAUDA वेबसिरीजच्या अधिकृत X अकाउंटवर देण्यात आली आहे. FAUDAमध्ये काम केलेले सर्व कलाकार आणि क्रू मेंबर कधीही भरून न येणाऱ्या या नुकसानामुळे दु:खी आहेत. आम्ही मातन मीरच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती प्रदान करो, असेही यात पुढे म्हणण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.