National Maritime Day : राष्ट्रीय सागरी दिन दरवर्षी ५ एप्रिलला का साजरा केला जातो?

जेव्हा सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडने एसएस लॉयल्टी ही पहिली बोट सुरू केली. हे भारतातील पहिले स्वदेशी जहाज मानले जाते. या घटनेच्या स्मरणार्थ ५ एप्रिल १९६४ पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

137
National Maritime Day : राष्ट्रीय सागरी दिन दरवर्षी ५ एप्रिलला का साजरा केला जातो?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी ही भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची प्रयोगशाळा आहे. त्याचे मुख्यालय गोव्यात आहे आणि त्याची मुंबई, कोची आणि विशाखापट्टणम येथे प्रादेशिक कार्यालये आहेत. याची स्थापना ०१ जानेवारी १९६६ रोजी झाली. उत्तर हिंद महासागरातील विशिष्ट समुद्रशास्त्रीय पैलूंचा तपशीलवार अभ्यास करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आता भारतात याविषयावर अभ्यास केला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day) दरवर्षी का साजरा केला जातो? (National Maritime Day)

राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day) दरवर्षी ५ एप्रिल रोजी साजरा केला जातो. भारतीय सागरी वाहतूक, सागरी संरक्षण आणि सागरी संसाधनांचे महत्त्व वाढवण्याच्या उद्देशाने या दिवसाचे आयोजन केले जाते. या दिवसाच्या निमित्ताने लोकांना भारतीय शिपिंग उद्योगाच्या क्रियाकलापांबद्दल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील भूमिकेबद्दल जागरूक केले जाते. (National Maritime Day)

(हेही वाचा – Heatwave: मुंबईसह विदर्भात उकाडा वाढला; आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली)

भारताने केला ४०० अब्ज रुपयांचा विक्रमी व्यापार

देशात प्रथम ५ एप्रिल १९६४ रोजी राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day) साजरा करण्यात आला, परंतु भारतात स्वदेशी नेव्हिगेशन प्रत्यक्षात ५ एप्रिल १९१९ रोजी सुरू झाले, जेव्हा सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडने एसएस लॉयल्टी ही पहिली बोट सुरू केली. हे भारतातील पहिले स्वदेशी जहाज मानले जाते. या घटनेच्या स्मरणार्थ ५ एप्रिल १९६४ पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. (National Maritime Day)

हे जहाज खरेतर ब्रिटिश जहाज होते जे १८९० मध्ये भारतात तयार करण्यात आले होते. ५९४० टन वजनाचे हे ४८५ फूट लांब जहाज ग्वाल्हेरच्या महाराजांनी १९१४ मध्ये खरेदी केले होते, जे नंतर त्यांच्या नावाच्या कंपनीने विकत घेतले. या कंपनीत वालचंद हिराचंद आणि नरोत्तम मोरारजी यांचा सहभाग होता. या जहाजाचा पहिला प्रवास ५ एप्रिल १९१९ रोजी सुरू झाला. यावर्षी देश ६१ वा राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day) साजरा करत आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारतातील सागरी व्यापार आणि वाहतूक पूर्णपणे इंग्रजांवर अवलंबून होती. पण स्वातंत्र्यानंतर हिंदी महासागरातील सागरी वाहतुकीत भारताला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अलीकडेच भारताने ४०० अब्ज रुपयांचा विक्रमी व्यापार केला असून त्यात सागरी वाहतुकीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (National Maritime Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.