Nashik City Police आयुक्तांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिली आदरांजली, भगुर वाड्यातील अष्टभुजा देवीला प्रार्थना करताना म्हणाले…

114
Nashik City Police आयुक्तांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिली आदरांजली, भगुर वाड्यातील अष्टभुजा देवीला प्रार्थना करताना म्हणाले...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४१वी जयंती मंगळवारी, (२८ मे) सर्वत्र साजरी करण्यात आली. नाशिक शहर पोलीस ठाण्यातही वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यासंदर्भातील माहिती नाशिक शहर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर ‘X’द्वारेही शेअर केली आहे. (Nashik Police)

नाशिक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूर येथील वीर सावरकर यांच्या वाड्यात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. वीर सावरकर यांच्या पुरातन वाड्याची माहिती घेतली तसेच वाड्यात असलेल्या अष्टभुजा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन देवीला प्रार्थना केली. (Nashik Police)


(हेही वाचा –Delhi Weather: राजधानी दिल्ली उष्णतेने होरपळली! ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद )

अष्टभुजा देवीच्या चरणी प्रार्थना करताना ते म्हणाले की, ‘माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीता मरेन किंवा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन.’

नाशिक शहराचे सी. पी. संदीप कर्णिक यांनी ‘X’वर लिहिले आहे की, महान स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली. ते आपल्याला अनंत काळासाठी प्रेरणा देत राहतील. शतश: नमन!!!

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.