आधी झाले जैन पंथाचे Muni, मग केला त्याग आणि आता मिळाला Padmshri Award

176
मुनी जिनविजय हे भारतातील प्राच्यविद्या, पुरातत्व, इंडॉलॉजी आणि जैन धर्माचे अभ्यासक होते. जिनविजय यांचा जन्म २७ जानेवारी १८८८ रोजी उदयपूरजवळील रुपाहेली, मेवाड येथे झाला. त्यांचे वडिलांचं नाव वृद्धीसिंह आणि आईचं नाव राजकुमारी…त्यांचे मूळ नाव किशनसिंह परमार असे होते.
दुर्दैवाने लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. दरम्यान ते मुनी देवीहंस यांच्या संपर्क आल्यानंतर त्यांना जैन धर्माविषयी ओढ वाटू लागली. त्यांना १९०३ मध्ये स्थानकवासी जैन भिक्षू म्हणून दीक्षा देण्यात आली. नंतर त्यांना श्वेतांबर जैन भिक्षू यांच्या संवेगी क्रमाने दीक्षा देण्यात आली आणि त्यांना मुनी जिनविजय असे नवीन नाव देण्यात आले. अशाप्रकारे किशनसिंह झाले जैन मुनी जिनविजय…(Muni)
गुजरातमधील पाटण येथील जैन तपस्वी कांतिविज यांच्याकडून त्यांनी संस्कृत आणि प्राकृत साहित्याचा अभ्यास केला. मात्र पुढे ते मुनींच्या पारंपरिक जीवनशैलीला कंटाळले आणि त्यांनी भिक्षुकीचा त्याग केला आणि पुढे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. महात्मा गांधींनी त्यांना निमंत्रण दिले म्हणून Muni Jinvijay हे गुजरात विद्यापीठात पुरातत्व विभागाचे प्राचार्य म्हणून काही वर्षे काम करु लागले.
१९२८ मध्ये  इंडोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी ते जर्मनीला गेले. १९२९ मध्ये ते भारतात परतले. १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले, त्यामुळे त्यांना तुरुंगवारी करावी लागली. पुढे ते शांतिनिकेतनमध्ये जैन साहित्याचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि तेथे १९३२ ते १९३६ पर्यंत अध्यापन केले. १९३९ मध्ये त्यांनी भारतीय विद्या भवनच्या पुरातत्व विभागाचे प्रमुखपददेखील भूषवले.
१९५० मध्ये Muni राजस्थान प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद संचालक झाले. त्यांनी गुजराती साहित्य परिषदेच्या इतिहास आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केले होते. १९६७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी २० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आणि अनेक पुस्तकांचे अनुवादही त्यांनी केले आहेत. १९६१ मध्ये त्यांना साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ३ जून १९७६ रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.