सीआयएसएफच्या जवानांकडून मुंबई पोलिसांना मारहाण

105

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा फोर्स (सीआयएसएफ)जवानांकडून मुंबई पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना कुलाब्यातील बधवार पार्क या ठिकाणी घडली. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे सीआयएसएफचे जवान असून दोघे जण नौदलाचे प्रशिक्षित आहेत.

( हेही वाचा : CIDCO Lottery 2022 : गृहस्वप्न साकार होणार! सिडको जाहिरात प्रसिद्ध; येथे करा ऑनलाईन अर्ज )

टॅक्सीचालक आणि पोलिसांना मारहाण

प्रवीणकुमार अशोक सिंग, चंद्रभान प्रताप सिंह, अभिजीतकुमार सिंह आणि आर.एस.दुबे अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. प्रवीणकुमार आणि चंद्रभान हे दोघे सीआयएसएफचे जवान असून अभिजित कुमार आणि आर.एस.दुबे हे दोघे नौदलाच्या प्रशिक्षणासाठी दिल्ली येथून आयएनएस हमला येथे आले होते. प्रवीणकुमार आणि चंद्रभान हे घणसोली येथील रिलायन्स जिओमध्ये ड्युटीवर आहेत. अभिजित आणि आणि चंद्रभान हे दोघे नातेवाईक आहेत.

रविवारी हे चौघे मुंबई फिरण्यासाठी कुलाबा येथे आले होते, चौघांनी टॅक्सीत बसून सिगारेट ओढत असताना टॅक्सी चालकांनी त्यांना सिगारेट ओढण्यास मनाई केली असता टॅक्सी चालक आणि चौघांमध्ये वाद झाला, कुलाबा येथील बधवार पार्क या ठिकाणी या चौघांनी टॅक्सी चालकाला चोप दिला असता त्या ठिकाणी कफ परेड पोलीस पोहचले.

पोलिसांनी घेतले ताब्यात 

पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाघमारे यांनी या चौघांच्या तावडीतून टॅक्सी चालकांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता या चौघांनी टॅक्सी चालकाला सोडले आणि पोलीस अधिकारी वाघमारे यांना ठोसाबुक्यांनी मारहाण करून पोलीस गणवेष फाडला, पोलीस अंमलदार पाटील हे वाघमारे यांच्या मदतीला आले असता या चौघांनी पाटील त्यांनाही मारहाण केली.

दरम्यान पोलिस ठाण्यातून या चौघांना आवरण्यासाठी अधिक पोलीस कुमक मागविण्यात आली, मदतीसाठी आलेल्या पोलिसांनी वाघमारे आणि पाटील यांची सुटका करून या चौघांना ताब्यात घेतले. मारहाणीत जखमी झालेल्या पोलिस अधिकारी वाघमारे, अंमलदार पाटील आणि टॅक्सीचालकाला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे, या चौघांना गुरुवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ट पोलीस निरीक्षक संदेश रेवळे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.