Mumbai Metro : मुंबईतील ‘या’ मेट्रोमुळे ७ लाख वाहने गायब होणार

145
Mumbai Metro

मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ठरणारा हा मेट्रो ( Mumbai Metro) प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबर पर्यावरणाचा समतोल राखायला मदत करणार आहे. या प्रकल्पाच्या कामामुळे सध्या प्रवाशांना त्रास होतो आहे. परंतु आता हा त्रास कायमचा संपून प्रवाशांची सोय होणार आहे. कुलाबा – वांद्रे – सीप्झ या मुंबईतल्या सर्वात पहिल्या भुयारी प्रकल्पाची सर्वांना प्रतीक्षा आहे. ही मेट्रो लाईन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मुंबई मेट्रो ( Mumbai Metro) रेल कॉर्पोरेशनने कंबर कसली आहे. मेट्रोच्या तिसऱ्या रेकचे डबे मुंबईत दाखल झाल्यानंतर आता कामाच्या हालचालींनी वेग पकडला आहे.

( हेही वाचा : ठाण्यात नवे मुख्यमंत्री कार्यालय; एकनाथ शिंदेंच्या मनात नेमके काय?)

मेट्रोमुळे (Mumbai Metro) १ हजार ४०० किलोमीटरचा प्रवास!

ज्या मेट्रोच्या डब्यांमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे, त्या मेट्रोचे कोच रेल कॉर्पोरेशन परराज्यातून आणणार आहे. आंध्र प्रदेशातल्या श्री सिटीमध्ये या मेट्रोचे डबे तयार करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशातील त्या कारखान्यापासून मुंबईपर्यंत हे डबे प्रवास करणार आहेत. हा प्रवास करण्यासाठी ६४ चाकी ट्रेलरला १२ दिवसांचा कालावधी लागला. या बारा दिवसांमध्ये ट्रेलरने १ हजार ४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. ४२ टन वजन असलेला मेट्रोचा कोच प्रत्येक ट्रेलरवर एक या पद्धतीने तिथून आणण्यात आला आहे.

सात लाख वाहने गायब?

दररोजच्या ट्रफिकला कंटाळलेल्या मुंबईकरांना ही मेट्रो ( Mumbai Metro) दिलासा देणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो ३ च्या पूर्णत्वानंतर सुमारे १७ लाख प्रवासी त्यातून प्रवास करू शकणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील सुमारे सात लाख खाजगी वाहनांची संख्या कमी होईल. लाखो लोकांनी खाजगी वाहनांच्या ऐवजी सार्वजनिक मेट्रोचा वापर केल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. आताच्या तुलनेत जवळपास २.३० लाख टनाने कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे.

प्रतीक्षा अजून किती काळ?

८५ किलोमीटर प्रतितास या वेगाने ही मेट्रो धावणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या वेळ निश्चितच वाचणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही पहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.