दोन दिवसात जामीन नाही मिळाला तर आर्यन खानची दिवाळी तुरूंगातच!

76

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूड बादशहा शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ‘तारीख पे तारीख’ दिली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अद्याप जामीन मिळालेला नसून वारंवार त्याचा जामीन अर्ज फेटाळला जात आहे. बुधवारी आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली होती आणि आजही त्याच्या जामीनावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्याला आजची रात्रही तुरूंगातच काढावी लागणार आहे. आर्यनच्या जामीन याचिकेवर उद्या गुरूवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. मात्र येत्या दोन दिवसात आर्यनला जामीन मिळाला नाही तर आर्यनची दिवाळी तुरूंगातच जाणार असल्याची चर्चा होताना दिसतेय. त्यामुळे जामीन मिळणार की त्याची दिवाळी तुरूंगातच जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

उद्या होणार पुन्हा सुनावणी

आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावरही मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून यावेळी अरबाज मर्चंटसाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद केला.

(हेही वाचा -वानखेडेंच्या चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईत पाच अधिकारी दाखल)

ज्येष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू सादर केली आहे. मात्र, या युक्तीवादाला अधिक वेळ लागल्याने न्यायालयाने या जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणीचा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने युक्तीवाद पुढे ढकलला. तीनही आरोपींच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला परंतु न्यायालयाचं कामकाज संपल्याने आजची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उद्या एनसीबीच्या वतीने युक्तीवाद होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.