Most Haunted Places in the World : ओम फट्‌ स्वाहा! ही आहेत जगातली सर्वात झपाटलेली स्थळे…

काही लोक या जगात भूत आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात तर काही लोक म्हणतात की या केवळ बनावट कथा आहेत. जगभरात अशी काही ठिकाणे आहेत जी झपाटलेल्या असल्यामुळे निर्जन आहेत. चला तर असा काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊया... (Most Haunted Places in the World)

105
Most Haunted Places in the World : ओम फट्‌ स्वाहा! ही आहेत जगातली सर्वात झपाटलेली स्थळे...

आपण फिरायला जातो ते पर्यटन स्थळे, पर्वत, नैसर्गिक सौंदर्य आणि समुद्रकिनारे, मंदिरे पाहायला… पण तुम्हाला जर कुणी विचारलं की भीतीदायक स्थळे पाहायला येता का? तर तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या पृथ्वीवरील आकर्षक पर्यटन स्थळांसोबतच अशी काही झपाटलेली आणि भीतीदायक ठिकाणे देखील आहेत, जिथे केवळ पर्यटकच नाही तर स्थानिक लोकही जाण्यास घाबरतात… (Most Haunted Places in the World)

केवळ भारतातच नाही तर जगभरात अशी रहस्यमय ठिकाणे आहेत, जिथले किस्से खूप भीतीदायक आहेत. मात्र अनेक धाडसी लोक अशा स्थळांना भेट देतात. काही लोक या जगात भूत आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात तर काही लोक म्हणतात की या केवळ बनावट कथा आहेत. जगभरात अशी काही ठिकाणे आहेत जी झपाटलेल्या असल्यामुळे निर्जन आहेत. चला तर असा काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊया… (Most Haunted Places in the World)

(हेही वाचा – North East Mumbai : ईशान्य मुंबईत वाढणार उपद्रव?, कोटक आणि सोमय्या कसे पुरुन उरणार!)

भानगढ फोर्ट (भारत)

राजस्थानमधील भानगढ येथे असलेला भानगढ किल्ला म्हणजे भारतातील सर्वात भयावह ठिकाण आहे. ज्या लोकांना या किल्ल्याबद्दल माहिती आहे, त्यांचं मन विचार करूनच थरथर कापते. भानगढ किल्ला हे जगातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. भानगढ हे जंगलाजवळ वसलेले एक ठिकाण आहे, जे भारतातील भुताटकीच्या कथांमुळे सर्वात प्रसिद्ध आहे. इथल्या एका जादूगाराला इथल्या राजकन्येशी प्रेम झालं होतं आणि त्याने राजकन्येला काबूत आणण्यासाठी काळी जादू केली होती. पण हे राजकुमारीला कळलं आणि तिने जादूगाराला मारले. मरताना जादूगाराने किल्ल्याला शाप दिला आणि त्यानंतर किल्ला झटलेला झाला. सूर्यास्तानंतर कोणत्याही पर्यटकाला या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही. (Most Haunted Places in the World)

अराडले लुनाटिक असाइलम (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियातील अराडले लुनाटिक असाइलम हे जगातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. इथल्या भीतीदायक कथा खूप लोकप्रिय आहेत. हे ठिकाण ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया शहरात आहे. खरंतर हे एक मानसिक रुग्णालय आहे जे १८६७ मध्ये सुरु झाले होते. नर्स केरीशी संबंधित अनेक भयकथा आहेत. त्यानंतर १९९८ मध्ये हे रुग्णालय बंद करण्यात आले आणि आता येथे पॉलिटेक्निक कॅम्पस आहे. (Most Haunted Places in the World)

डोमिनिकल हिल (फिलीपींस)

असे म्हटले जाते की या ठिकाणी युद्धादरम्यान अनेक लोक मारले गेले आणि नंतर जे जखमी झाले त्यांचाही अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. आजही या झपाटलेल्या वाड्यात आत्मे फिरत असतात. लोक म्हणतात की इथे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात, जसे कोणी वेदनांनी ओरडत आहे, रिकामी भांडी फोडत आहे, दार ठोठावत आहे. तुम्हाला इथे जायला आवडेल का? (Most Haunted Places in the World)

हेल फायर क्लब (आयर्लंड)

आयर्लंडमधील ही झपाटलेली इमारत मॉन्टपिलर हिलवर १७२५ मध्ये बांधली गेली होती. हे ठिकाण डब्लिन उच्चभ्रू लोक मजेसाठी आणि शैतानाच्या पूजेसाठी वापरत होते. हे आयर्लंडमधील सर्वात भयानक ठिकाणांमध्ये गणले जाते. ही जागा ओसाड आहे. तिथे कोणी जात नाही आणि कुणी गेलं तर परत येत नाही. (Most Haunted Places in the World)

मार्क किंग्स क्लोज (स्कॉटलंड)

मार्क किंग्ज क्लोज ऑफ स्कॉटलंड पूर्वी भूमिगत रस्ते आणि बोगद्यांसाठी ओळखले जायचे. १६४५ मध्ये प्लेग पसरल्यानंतर हे ठिकाण रिकामे करण्यात आले. मात्र आता या ठिकाणाचा देखील जगभरातील सर्वात भयानक ठिकाणांमध्ये समावेश होतो. अनेक रहस्यमय घटनांची माहिती येथे उपलब्ध आहे. या ठिकाणी विचित्र आवाज येतात. (Most Haunted Places in the World)

मॉन्टे क्रिस्टो होमस्टेड (ऑस्ट्रेलिया)

मॉन्टे क्रिस्टो होमस्टेड हा न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया येथील एक झपाटलेला वाडा आहे. या वाड्याची मालकीण क्रॉलीची आत्मा इथे भटकते असे म्हटले जाते. पतीच्या मृत्यूनंतर, क्रॉली २३ वर्षे हवेलीतून बाहेर पडली नाही आणि शेवटी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचे मृतदेह त्याच हवेलीत पडून राहिला आणि अंतिम संस्कारही झाले नाहीत. आजही मॉन्टे क्रिस्टो होमस्टेडच्या कॉरिडॉरमध्ये विचित्र आवाज, चमकणारे दिवे आणि भूत तरंगत असल्याचे दिसले आहे. तर याआधीही हवेलीत अपघात आणि खून झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. (Most Haunted Places in the World)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.