-
भाग्यश्री करजगावकर
२२ एप्रिलला पहलगामला आनंद लुटायला गेलेल्या निष्पाप जीवनांनाच लुटले गेले. त्यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांची लज्जास्पद रितीने हत्या करून आतंकवाद्यांनी अत्यंत घृणास्पद काम केले. सर्व जगभरात याचे प्रतिसाद उमटले. भारताच्या मर्मावर घातलेला हा मोठाच घाव होता. भारत आता काय प्रतिक्रिया देणार, कसे प्रत्युत्तर देणार यावर सगळ्यांचे लक्ष होते. दोन-चार दिवस गेल्यावर आपला विरोधी पक्ष ओरड करू लागला इतके दिवस काय करताय? नुसत्या मीटिंग्स घेऊन काय होणार? त्यांना पंतप्रधानांनी धडा शिकवायला पाहिजे. संरक्षणमंत्र्यांना काहीच माहिती कशी नव्हती? त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होऊ लागली, एवढेच नाही, तर आपले पंतप्रधान नेमके तेव्हाच कसे प्रदेश दौऱ्यावर गेले??? वगैरे अनेक कमकुवत डोक्यांमधून टीकास्त्र सोडले जात होते; पण खरा योद्धा किंवा रणनीतीज्ञ काय असतो, याची ते कल्पना करू शकत नाहीत. त्यांना अगदीच माहित नाही, असे नाही. आपले पंतप्रधान आणि आपलं लष्कर काय करू शकतं याचे प्रत्यक्षिक त्यांना एकदा मिळाले होते. बालाकोटवर सर्जिकल स्ट्राइक करून त्यांनी तेव्हा पण पाकिस्तानला सणसणीत उत्तर दिलंहोतं. पण कोणाचाही मोठेपणा कबूल करायला मनाचा मोठेपणा लागतो. तो या विहिरीत राहणाऱ्या बेडकांना काय येणार? कूपमंडूक प्रवृत्तीमुळे ते झालेल्या घटनेचे पुरावे मागत होते, असं वाटत होतं की, पुरावे मागणाऱ्यांनाच तिथेच पुरावे आणि मग सर्व गोष्टींचे सगळ्यांना आपोआपच मिळतील पुरावे .. (Operation Sindoor)
या पूर्ण घटनेवरून शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राची आठवण आल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी कधी संरक्षक नीती, तर कधी आक्रमक नीतीचा अवलंब केला होता. अफजलखानाला धडा शिकवताना महाराजांनी अत्यंत विचारपूर्वक खेळी खेळली. जावळीसारख्या घनदाट जंगलातील प्रतापगडाची निवड केली. खान हळूहळू पुढे सरकत होता. बलाढ्य सेनेचा दबाव शत्रूवर टाकत होता. आपला मोठेपणा सगळ्यांना दाखवत होता. शिवाय रस्त्यातील हिंदूंची अनेक धार्मिक स्थळे उध्वस्त करत चालला होता. अनेक निष्पाप लोकांना लुटत होता, गावेच्या गावे बेचिराख होत होती, लूटपाट, जाळपोळ सामान्य जनतेचा वाटेल, तसा छळ होत होता. त्याचा उद्देश एकच, महाराजांनी गड सोडून उघड्या मैदानावर युद्ध करावे. शिवाजी महाराजांनी अत्यंत शांतपणा दाखवून आपल्या बळाचा कुठेही गाजावाजा न करता योग्य वेळ आल्यावर त्या ३२ दातांच्या बोकडाचा कोथळा बाहेर काढला. त्यामुळे सगळ्या पातशाह्यांना धडकी भरवणारा संदेश गेला, शिवाजी महाराजांना कमजोर समजून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त शक्ती नाही, तर बुद्धीच्या बळावर आपल्याला शह देतो, हे त्यांना मान्य करावेच लागले. (Operation Sindoor)
आताही पाकिस्तानने काय केले, अनेक ठिकाणी कुरापती काढून हिंदू मुसलमानांमध्ये दंगे घडवून आणले, हजारो पाकिस्तानी नागरिक अवैधरित्या भारतात घुसवले, एवढंच नाही, तर सीमारेषेवर सतत नियमांचे उल्लंघन करून गोळीबार सुरूच ठेवला होता. जेणेकरून भारत चिडून काहीतरी प्रत्युत्तर नक्कीच देईल. मग कहर म्हणून त्यांनी मोठं पाऊल उचललं आणि पहलगांम मध्ये पर्यटकांवर हल्ला चढवला आणि फक्त पुरुषांनाच मारलं. स्त्रियांबद्दल काय खूप सहानभूती होती म्हणून त्यांना सोडलं? नाही तर घरचा कर्ता पुरुष मारला की संपूर्ण कुटुंब उध्वस्त होतं. शिवाय हिंदूंची नवी पिढी तयारच होणार नाही. बायका मुलांना पळवून नेलं नाही, हे नशीब ! मोदीजींनी बरोबर रणनीती आखली. भरू द्या यांची शंभरी. पूर्ण जगासमोर यांचा खरा चेहरा येऊ द्या मग यांना असं उत्तर द्यायचं की, त्याची इतिहासात नोंद घेतली जाईल. खरंच एवढा शांतपणा एखाद्या सिद्ध योग्या जवळ असतो नाहीतर शिवाजी महाराजांच्या खऱ्या अभ्यासकाला लाभतो. मोदीजींनी संरक्षण रणनीतीचा वापर केला व अचानक शत्रू जरा गाफील असताना सरळ त्याच्या हद्दीतच जाऊन त्याला गाडला. आली ना शाहिस्तेखानावरील स्वारीची आठवण !!! (Operation Sindoor)
लाखाच्या वरील सेनेच्या गराड्यात घुसून महाराजांनी त्याला जन्माची अद्दल घडवली. शास्ताखान बचावला; पण मानसिकरित्या तो इतका धास्तावला की पुन्हा त्याने कधीच डोकं वर काढायची हिंमत केली नाही. आजच्या पार्श्वभूमीवर अजून एका व्यक्तीची प्रकर्षाने आठवण येते ती म्हणजे बहिर्जी नाईक !!! शत्रू सैन्याची खडानखडा माहिती मिळवायची आणि त्यानुसार युद्धनीती ठरायची. अजित डोभाल हे मला आजचे बहिर्जी नाईक वाटतात. अत्यंत हुशार; सशक्त हेर खातं त्यानुसार अगदी सूक्ष्म म्हणजे मायक्रो प्लानिंग करूनच पुढे जायचं, हे त्यांचं तत्त्व. शत्रूची मानसिकता जाणणे, आपल्या प्रत्युत्तराने तो काय काय करू शकतो? त्याचे आक्रमक धोरण काय राहू शकते आणि त्यानुसार आपल्याला काय काय तयारी करायला हवी, या सर्व गोष्टींचा बारीक बारीक विचार करणारी व्यक्ती खरोखरच असीम देशभक्त आहे आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे.. (Operation Sindoor)
(हेही वाचा – Pakistani Spy : पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या अरमानला हरियाणाच्या नूंहमध्ये अटक; ISIला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप)
महाराजांच्या नितीनुसार सेनापतींनी त्याची युद्धनीती ठरवायची, पंत अमात्यांनी आर्थिक व्यवहार सांभाळायचा, पंतसचिवांनी पत्रव्यवहार बघायचा वगैरे त्याच नीतीचा अवलंब करून मोदीजींनी भारतीय स्थलसेना, नौ सेना आणि वायुसेना या सर्वांच्या मुख्याधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवून दिली. स्थळ, काळ, वेळ त्यांनीच ठरवायचे कारण त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. पाठीशी अनुभव देखील आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी सूचना केल्या, तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. या कृतीमुळे सगळ्यांचे मनोबल किती पटीने वाढल असेल, याची कल्पना करा. नाहीतर बंदुकीत गोळी आहे, शत्रू समोर येऊन आम्हाला मारतोय पण आम्हाला, आमच्या सैन्याला परवानगी घेतल्याशिवाय प्रत्युत्तर देता येत नाही. आपल्या सेनेला पूर्वी अनेकदा असे अनुभव आलेले आहेत. शत्रूचा तो भाग जिंकायची परिस्थिती असताना देखील पंतप्रधान त्यांना परत बोलवून घेतात व युद्ध विराम जाहीर करतात… आज पाकव्याप्त काश्मीर केव्हाच आपल्या हातात असते; पण तेव्हाच योग्य निर्णय घेतला असता तर !! याचं शल्य कितीतरी माजी अधिकाऱ्यांच्या शब्दाशब्दातून जाणवतं. यावेळेस मात्र सर्वांचे मनोबल प्रचंड प्रमाणात उंचावलं आहे. (Operation Sindoor)
एवढं झाल्यावर पाकिस्तानी मुसलमान चिडणार आणि बाहेरून नाही, तर देशाच्या आत काहीतरी तमाशा करणार हे जाणून रहा, जागृत रहा व त्यांचा सामना करा. यांना घाबरायचे कारण नाही. अनेक शूर योद्ध्यांचे रक्त आपल्या नसांत सळसळत आहे. फक्त सर्व हिंदूंनी संघटित व्हायला हवे, हे मात्र नक्की. हिंदूंनो, सैन्यात जा. रणक्षेत्रात आपला पराक्रम गाजवून युद्ध प्रशिक्षण घ्या. आपल्या देशासाठी पुढे ते हिताचे ठरणार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीच पुढील परिस्थिती काय होऊ शकते, याचे आकलन आणि दूरदृष्टी असणारी व्यक्ती म्हणजेच स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर.. सावरकरांनी बेधडकपणे संदेश दिला होता, राजनीतीचे हिंदूकरण करा आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा! जातीय राजकारणाची जागरूकता व मुस्लिम लीगचे अंतस्थ मनसुबे पुढे सगळ्यांना धोका निर्माण करणारे आहेत, हे सावरकरांच्या दूरदृष्टीला समजले होते. सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, हे पण निश्चितच होतं. (Operation Sindoor)
(हेही वाचा – IPL 2025 : ‘थँक्यू आर्म्ड फोर्सेस’, राजस्थानविरुध्द पंजाब सामन्यात सैन्यदलांच्या शौर्याला सलाम)
सावरकर म्हणतात, कागदी ठरावांच्या भाऱ्यांनी नव्हे, तर रायफलीच्या माऱ्यांनीच स्वातंत्र्य मिळवता येतं व ते टिकवता देखील येतं. त्यामुळे हिंदूंच्या सैनिकीकरणावर भर देणं आवश्यक होतं. या वेळेस सावरकरांनी म्हटलं देखील होतं सैन्यात जा, शस्त्र चालवणं शिकून घ्या, मग त्याच बंदुकांचं तोंड कोणत्या दिशेने फिरवायचं ते आपण वेळेवर ठरवू. सावरकरांनी कर्णावती म्हणजेच अहमदाबाद येथे स्वातंत्र्यानंतर १९४९ मध्ये झालेल्या अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात ठणकावून सांगितलं होतं आणि रणगर्जना पण दिली होती ‘एक धक्का और दो और पाकिस्तान तोड दो’; पण या गर्जनेवर सुद्धा बंदी घालण्यात आली आणि मुसलमानांचे लाड चालूच ठेवण्यात आले. सावरकरांच्या विचारांचा अभ्यास केलेल्या आपल्या पंतप्रधानांनी ‘अग्नीवीर’ योजना सुरू केली. प्रत्यक्ष सरहद्दीवर लढणं सगळ्यांना शक्य नाही पण निदान आपली युवा पिढी अंतर्गत बंडाळी माजली, तर तो युवक जनतेचे रक्षण करू शकेल. (Operation Sindoor)
सैनिकी शिस्त, शस्त्रांची माहिती ते चालवण्याचे प्रशिक्षण व नंतर नोकरीसुद्धा मिळणार होती. अशा सकारात्मक विचारांच्या योजनेला सुद्धा कितीतरी लोकांकडून विरोध झाला. अजून मोठा विरोध झाला, तो संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या क्षेपणास्त्र खरेदीला. वादाच्या भोवऱ्यात न अडकता त्यांनी राफेल आणि एस ४०० याची देशाला खूप गरज पडू शकते, हे आधीच जाणून त्याची खरेदी केली. या खरेदीमुळे शॉर्ट आणि मिडीयम रेंजच्या डिफेन्स सिस्टम्सची गरज राहिली नाही. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत बनवलेले ब्राह्मोस हे केवळ शस्त्र नाही, तर भारतीय सशस्त्र दलांच्या शक्तीचा मोठा संदेश आहे. हे सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आपल्या सैन्याला वरदान ठरणार आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा पहिलेच अंदाज घेऊन पुढाकाराने अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे मनोहर पर्रीकर, आपली तिन्ही दले आणि योग्य निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, संरक्षणमंत्री, तसेच अत्यंत हुशार अजित डोभाल आणि तज्ञ लोकांच्या टीमचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. सर्व भारतीयांना या सगळ्यांचा नेहमीच अभिमान आहे व भविष्यातही राहील. (Operation Sindoor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community