Paris Hilton : या मॉडेलने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी केले होते मॉडलिंग

पॅट्रीशिया फिल्ड आणि बेट्सी जॉन्सन्स या फॅशन डिझायनर्सचा प्रभाव पॅरिसवर चांगलाच पडला होता. त्यानंतर तिने आयुष्यात पुढे मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि १९ व्या वर्षी पहिल्यांदा ट्रम्प मॉडेल मॅनेजमेंट या कंपनीतर्फे मॉडेलिंगला सुरुवात केली.

127
Paris Hilton : या मॉडेलने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी केले होते मॉडलिंग

पॅरिस हिल्टन (Paris Hilton) हिचा जन्म १७ फेब्रुवारी १९८१ साली न्यूयॉर्क येथे झाला. ती न्यूयॉर्क आणि लॉस अँजलीस या शहरांमध्ये लहानाची मोठी झाली. पॅरिस (Paris Hilton) ही हिल्टन हॉटेल्सचे संस्थापक काँरड हिल्टन यांची नात आहे. पॅरिस हिल्टन (Paris Hilton) ही एक मॉडेल, बिझनेसवुमन तसेच पॉप सिंगर आहे. पॅरिस हिल्टन हिने वयाच्या १९ व्या वर्षी मॉडलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ट्रम्प मॉडेल मॅनेजमेंट’ नावाच्या मॉडेलिंग एजन्सीमधून तिने पहिल्यांदा सोशल प्लॅटफॉर्मवर काम केले. त्याआधी लहानपणापासूनच पॅरिसने आपल्या आई आणि बहिणीसोबत अनेकदा वेगवेगळ्या चॅरिटी फंड्ससाठी मॉडेलिंग केलेली आहे. ती एक पॉप सिंगरही आहे. (Paris Hilton)

वयाच्या सोळाव्या वर्षांपासून पॅरिस आणि तिच्या बहिणीला अनेक नाईट क्लबमध्ये, इव्हेंट्समध्ये परफॉर्म करण्यासाठी बोलावले जायचे. ती रात्री खूप उशिरापर्यंत घराबाहेर राहायला लागली. तीची ही लाइफस्टाइल तिच्या परंपरागत आणि रुढीवादी कुटुंबाला कधीच रुचणारी नव्हती. त्यामुळे पॅरिसला (Paris Hilton) अठरा वर्षांची होइपर्यंत बोर्डिंग स्कुलमध्ये ठेवण्यात आले होते. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. बोर्डिंगमधून बाहेर आल्यावर पॅरिसने पुन्हा आपली जुनी लाइफस्टाइल अवलंबली. (Paris Hilton)

(हेही वाचा – CRIME: लैंगिक अत्याचार करणाऱ्या नौशाद शेखच्या अनधिकृत बांधकामावर फिरला बुलडोझर)

या मासिकांच्या मुखपृष्ठावर पॅरिस हिल्टन

पॅट्रीशिया फिल्ड आणि बेट्सी जॉन्सन्स या फॅशन डिझायनर्सचा प्रभाव पॅरिसवर चांगलाच पडला होता. त्यानंतर तिने आयुष्यात पुढे मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि १९ व्या वर्षी पहिल्यांदा ट्रम्प मॉडेल मॅनेजमेंट या कंपनीतर्फे मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने कॅथरीन मॉलंड्रीनो आणि मार्क बॉवर यांच्यासाठी मॉडेलिंग केले. सप्टेंबर २००० सालच्या व्हॅनिटी फेअरच्या अंकासाठी पॅरिसने (Paris Hilton) आपल्या बहिणीबरोबर फोटोशूट केला होता. ते फोटोशूट डेव्हिड ला चॅपेल याने केला होता. या फोटोग्राफरने पॅरिसचे खूप कौतुक केले होते. या फोटोशूट नंतर पॅरिसने (Paris Hilton) न्यूयॉर्क फॅशन विकमध्ये रॅम्पवॉक केला. त्यावेळेसच्या तिच्या परफॉर्मन्सने तिला सर्वांत लोकप्रिय मॉडेल्सच्या यादीत जागा मिळवून दिली. त्यानंतर ती इटालियन ब्रँड आइसबर्गच्या जाहिरातीत, वोग आणि एफ. एच. एम या मासिकांच्या मुखपृष्ठावर चमकली. (Paris Hilton)

मॉडेलिंगसोबतच पॅरिसने (Paris Hilton) अभिनयक्षेत्रातही काम केले. तिने इंडिपेंडेंड टीन थ्रिलर स्विटी पाय, हनी बनी व्हिडीओ अल्बम आणि एका शॉर्टफिल्मसाठीही काम केले होते. आशा कित्तीतरी मालिका, अल्बम्स आणि शॉर्टफिल्मच्या माध्यमातून पॅरिसला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. पॅरिसला मिळालेली प्रसिद्धी तिने आपला बिझनेस सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी उपयोगात आणली. पॅरिसने आपले सेल्फ ब्रँड बुटिक्स वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू केलेले आहेत. तसेच फिलिपाइन्समध्ये तिचा एक बीच क्लबसुद्धा आहे. (Paris Hilton)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.