मुक्ताईनगरजवळ अपघात; दुधाच्या टँकरला ट्रकची धडक, ५ जणं जागीच ठार

53

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला असून या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघात दुधाची टँकर आणि ट्रकची धडक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव मुक्ताईनगर घोडसगाव जवळ हायवे क्रमांक ६ वर हा अपघात झाला. या अपघातात ४ जण धुळे जिल्ह्यातील मयत झाले आहेत. तर १ जण जळगावमधील मयत झाला आहे. हा अपघात आज गुरूवार, पहाटे ३ वाजेच्या सुमारास घोडसगाव परिसरात घडला आहे. या अपघातासंदर्भातील माहितीला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

(हेही वाचा- मुंबई पोलीस दलातील ‘बॉम्ब स्कॉड’ एक दुर्लक्षित विभाग )

दुधाचा एक टँकर रस्त्यावर बंद पडलेला होता. त्यामुळे त्या बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी दुधाचा टँकर आणि क्रेनला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. या धडकेत ५ जण ठार झाले असल्याचे सांगितले जात आहे. या मृतांची माहिती अद्याप उपलब्ध झाली नसून याप्रकरणी पंचनामा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

यासह नागपूर महामार्गावरील पार्डीजवळ आज, शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बस चालक आणि १० प्रवासी गंभीर जखमी असून १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.