मावळा पुन्हा झाला स्वार, गिरगावातून करणार आक्रमण

160

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड)च्या बांधकामांमधील पहिला मैलाचा दगड अर्थात प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यानच्या २.०७० किलोमीटर अंतराचा बोगद्याचे काम जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण केल्यानंतर आता पुन्हा एकदा मावळा दुसऱ्या लढाईसाठी स्वार झाला. गिरगाव ते प्रिय दर्शनी पार्कपर्यंतच्या दुसऱ्या समांतर बोगद्याच्या कामासाठी मावळा आता स्वार झाला असून लवकरच मावळा ही मोहिम फत्ते करेल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे.

( हेही वाचा : नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यानंतर भाजपची महापालिका आयुक्तांकडे ही मागणी )

बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. यातील पहिल्या बोगद्याचा २ किलोमीटरचा टप्पा जानेवारी महिन्यात पूर्ण झाला. आता उजव्या बाजुकडील भ्यारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता छोटा चौपाटीपासून प्रियदर्शनी पार्कच्या दिशेने डावीकडच्या बाजूने मावळा आता बोगद्याचा मार्ग स्वार करायला निघाला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समांतर असलेल्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असून बोगद्याच्या खोदकामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या बोगद्याचेही अंतर २.०७० किलोमीटर एवढे आहे.

प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण

बोगदे बांधकाम अंतर्गत पहिला बोगदा खणन करण्‍याची सुरुवात ११ जानेवारी २०२१ रोजी प्रियदर्शनी पार्क येथून करण्‍यात आली होती. बोगद्याचा एक किलोमीटरचा टप्‍पा ४ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला. तर २ किलो‍मीटरचा टप्‍पा २९ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर जानेवारी २०२२मध्ये या बोगद्याचे पूर्ण काम करण्यात आले. कोविड विषाणू साथरोगाच्या काळातदेखील या प्रकल्पाच्या बांधकामावर विपरित परिणाम न होऊ देता वेगाने काम करुन घेण्‍यात महानगरपालिकेला यश आले होते. त्यामुळे तेवढ्या अंतराच्या दुसऱ्या समान बोगद्याचे काम याआधीच्या कामाच्या अनुभवाच्या आधारे डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाचे काम अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हाती आल्यापासून त्यांनी या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी कोस्टल रोडचे प्रमुख अभियंते मोहन माचीवाल, विजय निघोट आणि विद्यमान प्रमुख अभियंता चक्रधर कांडरकर यांच्या मदतीने महापालिकेने हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.