मालदीवच्या शिक्षण राज्यमंत्र्यांची देशातील मुंबई महापालिकेच्या अव्वल शाळेला भेट

131

देशातील दहा अव्वल शाळांमध्ये महापालिकेच्या ज्या दोन शाळांचा समावेश आहे, त्यातील मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभाग कार्यक्षेत्रातील खान अब्दुल गफार खान मार्गालगत असणाऱ्या ‘वरळी सी फेस’ शाळेला मालदीव देशाचे शिक्षण राज्यमंत्री अब्द्ल रशीद यांनी भेट घेत येथील शिक्षण पध्दतीचा आढावा घेतला.

(हेही वाचा – ‘दोन दिवसात सगळं सुरळीत होईल…’, परबांनी मागितली जनतेची माफी!)

शिक्षण राज्यमंत्री अब्दुल रशीद यांचे शाळेतील विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने विविध संगीत धून वाजवून सलामी देत स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी शाळेतील सभागृहात आयोजित प्रदर्शनास भेट दिली. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, टाकाऊ पासून टिकाऊ या अंतर्गत तयार केलेल्या विविध वस्तू, विविध खेळांची आणि योगासनांची प्रात्यक्षिके, संगीत कला, सुतार काम, शिवणकाम इत्यादींची प्रात्यक्षिके, स्काऊट गाईडच्या कार्यक्रमांशी संबंधित बाबींचा समावेश होता. या भेटीदरम्यान शाळेतील प्रयोग शाळा, टिंकरिंग लॅब इत्यादींनाही भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.‌ तसेच शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये असणाऱ्या व्यवस्थेचे ही मान्यवरांनी कौतुक केले.

त्या विद्यार्थ्यांचे पालक निश्चितच भाग्यवान

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये देण्यात येत असलेले शिक्षण, शाळांमधील शैक्षणिक सुविधा, कला विषयक प्रशिक्षण, व्यवसायिक प्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण पाहून भारावून गेल्याचे व आनंद झाल्याचे नमूद करत मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी व त्या विद्यार्थ्यांचे पालक हे निश्चितच भाग्यवान आहेत, असल्यासचे गौरवोद्गगार अब्दुल रशीद यांनी काढले. याप्रसंगी सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी, उप शिक्षणाधिकारी संजीवनी कापसे, शाळेच्या मुख्याध्यापिका निशा म्हात्रे व बागेश्री केतकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.