Veer Savarkar : मेजर अनिल अर्स यांना यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य’ पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

55

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने  देण्यात येणाऱ्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य’ पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे. मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल अर्स यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार – २०२५’, जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वीर सावरकर यांच्या आदर्श विचारांना अनुसरून राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

मेजर अनिल अर्स यांचा परिचय

मेजर अनिल अर्स हे जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर कंपनी कमांडर म्हणून कार्यरत होते. त्यांना जेव्हा काही दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय जवानांवर हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी प्रसंगावधान दाखवत दहशतवादी टप्प्यात येण्याची प्रतीक्षा केली. दहशतवाद्यांचा गट टप्प्यात येताच मेजर अनिल अर्स यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने गोळीबार करून तीन दहशतवाद्यांना ठार केले. नियंत्रण रेषेच्या जवळ मेजर अनिल अर्स यांनी ही कारवाई केल्याने नियंत्रण रेषेपलीकडूनही जोरदार गोळीबार सुरु झाला. त्यावेळी जीवितहानी होण्याचा धोका पत्करून ते त्यांच्या पथकासोबत उर्वरित दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी तिथेच थांबले. १५ मिनिटांनंतर त्यांच्या पथकाने आणखी दोन दहशतवाद्यांना पाहिले आणि अचूक गोळीबार करून त्यांनाही कंठस्नान घातले. आपल्या पथकातील सहकाऱ्यांना सुरक्षित ठेवत दहशतवाद्यांचा खात्मा करणारे मेजर अनिल अर्स यांनी अदम्य साहस आणि लढाऊ नेतृत्व दाखविल्याबद्दल २०१९ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ‘शौर्य चक्र’ प्रदान करण्यात आले. (Veer Savarkar)

(हेही वाचा Pakistan: ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकड्यांचे ३५ जवान ठार; पण मुल्ला मुनीरची कातडी बचाव प्रतिक्रिया; म्हणतो…)

याआधी सन्मानित करण्यात आलेले मान्यवर

राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) जयंतीनिमित्त  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य’ देऊन गौरविण्यात येते. शौर्य पुरस्काराची सुरुवात १९८९ मध्ये परमवीर चक्र विजेते भारतीय सैन्यातील नायब सुभेदार बाणा सिंग यांना सन्मानित करून करण्यात आली. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि १ लाख १००१ रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी साधना पवार (अशोकचक्र), नीला सावंत, ले. कर्नल शांतीस्वरूप राणा (अशोकचक्र) मरणोत्तर, कॅप्टन विक्रम बत्रा (परमवीर चक्र) मरणोत्तर, वीरबाहू हुतात्मा तुकाराम गोपाळ ओंबळे आदींना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.