NCC : महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास (१२२ कॅडेट चा सहभाग), मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी बॅनर स्वीकारला. प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट काजल सातपुते, नचिकेत मेश्राम, खुशी झा, विवेक गांगुर्डे यांच्यासह संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारले.

183
NCC : महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान
NCC : महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद सलग तिसऱ्यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवारी (२७ जानेवारी) महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी (NCC) रॅलीमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ २०२३-२४ च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या (NCC) बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते. (NCC)

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी (NCC) संचालनालयास (१२२ कॅडेट चा सहभाग), मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी बॅनर स्वीकारला. प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची (NCC) कॅडेट काजल सातपुते, नचिकेत मेश्राम, खुशी झा, विवेक गांगुर्डे यांच्यासह संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग (VSM) यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारले. देशातील एकूण १७ एनसीसी (NCC) महासंचालनालयाच्या डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी १ ते २७ जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’ चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर कर्नाटक आणि गोवा एनसीसी (NCC) संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान विभागून प्रदान करण्यात आला. यावेळी, नागपूरच्या रिमाउंट व वेटेरिनरी स्काड्रन कॅडेट ने सर्वोत्कृष्ट टेंट पेगर ट्रॉफी जिंकली. महाराष्ट्र संचालनालय यांनी सलग तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. (NCC)

(हेही वाचा – CM Eknath shinde : मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

महाराष्ट्राला सात वर्षानंतर सलग तीसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी (NCC) संचालनालयाला यापूर्वी एकूण १९ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. राज्याने मुसंडी घेत मागील दोन वर्षांपासून प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याला तब्बल आठ वर्षाने सलग तीन वर्ष प्रधानमंत्री बॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे. (NCC)

महिनाभर चाललेल्या शिबिरात छात्रसैनिकांनी कवायती, राजपथ संचलन, पंतप्रधानांना मानवंदना, पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन, फ्लॅग एरिया ब्रीफिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. संपूर्ण शिबिरात सर्व स्पर्धांमध्ये तुकडीच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे एनसीसी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा मान मिळाला. २७ जानेवारी रोजी करिअप्पा संचलन मैदानावर आयोजित पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हस्ते एनसीसीच्या (NCC)  महाराष्ट्र संचालनालयाला पंतप्रधान ध्वज निळाला. (NCC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.