Maharashtra Day : उद्धव ठाकरे यांनी वाहिली हुतात्मांना आदरांजली

खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

148
Maharashtra Day : उद्धव ठाकरे यांनी वाहिली हुतात्मांना आदरांजली

संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा केला जातो आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रविवार ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजता फ्लोरा फाउंटन परिसरातील हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

 

(हेही वाचा – Maharashtra Day : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा)

संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चळवळीत अनेक गोष्टी घडल्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी हा लढा लढला गेला. ‘मुंबईसह महाराष्ट्र’ (Maharashtra Day) झालाच पाहिजे असे नारे सुरु झाले. अखेर १ मे १९६० रोजी १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र ही मोहीम फत्ते झाली. तेव्हापासून आपण १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो.

हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=Q3rWYycj1jA

आज महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे परेड संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.