Chandrayaan – 3 : 70 वर्षात जगभरातील देशांच्या 111 चंद्रमोहिमा; किती झाल्या अपयशी, किती झाल्या यशस्वी?

1998 ते 2023 दरम्यान भारत, अमेरिका, रशिया, जपान, यूरोपीय संघ, चीन आणि इस्त्रायलने चंद्र मोहिमा केल्या.

156

ज्या क्षणाची प्रत्येक भारतीयाला प्रतीक्षा आहे, तो क्षण आता आला आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर लँड होणार आहे. चंद्रावर जाण्याचे स्वप्न अनेक देशांनी पाहिले, पण त्या वाटेत अनेक विघ्ने आली. मागील 70 वर्षात जगभरातील देशांनी एकूण 111 चंद्रमोहिमा हाती घेतल्या पण सर्वांना यश मिळाले नाही. या 111 पैकी 66 चंद्रमोहिमा अयशस्वी ठरल्या. तर 41 मोहिमा पूर्णपणे अपयशी ठरल्या. फक्त 8 चंद्रमोहिमांमध्ये काहीसे यश मिळाले.

‘या’ देशांकडून चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न

1998 ते 2023 दरम्यान भारत, अमेरिका, रशिया, जपान, यूरोपीय संघ, चीन आणि इस्त्रायलने चंद्र मोहिमा केल्या. यात इम्पॅक्टर, ऑर्बिटर, लँडर-रोव्हर आणि फ्लायबाय मशीन्स होते. यूरोपचे स्मार्ट-1, जपानचे सेलेन, चीनचे चांगई-1, भारताचे चांद्रयान-1 अमेरिकेच्या लूनर रीकॉनसेंस ऑर्बिटर मिशन यांचा यात समावेश आहे. आतापर्यंतच्या चंद्रमोहिमा आव्हानात्मक होत्या. अमेरिकेलाही अनेकदा चांद्रमोहिमेत अपयश आले.

(हेही वाचा India : आता भारतात नवीन गाड्यांची होणार ‘क्रॅश टेस्ट’, नंतरच ठरणार त्यांचा दर्जा; काय आहे हे प्रकरण?)

आव्हानात्मक चंद्रमोहिमा

  • 17 ऑगस्ट 1958 रोजी अमेरिकेने पहिली चंद्र मोहीम आखली, जी अयशस्वी ठरली.
  • 1958 मध्ये अमेरिका आणि सोव्हिएत महासंघाने सहा चंद्रमोहिमा आखल्या, ज्या अयशस्वी ठरल्या.
  • 1967 मध्ये अमेरिकेचे सर्वेयर 4 यान चंद्रावर उतरण्यापूर्वीच यानाचा संपर्क तुटला.
  • 1969 ते 1974 सोव्हिएत महासंघाचे लुना-15, लुना-18, लुना-23 चंद्रावर कोसळले.
  • 2019 रोजी भारताचे चंद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क अखेरच्या क्षणी तुटला.
  • 19 ऑगस्ट 2023 ला रशियाचे लुना-25 चंद्रावर कोसळले.
  • 2008 पासून आतापर्यंत भारताच्या तीन चंद्र मोहिमा झाल्या आहेत.

चांद्रयान-1

  • 28 ऑगस्ट 2008 रोजी मोहीम सुरु झाली.
  • 12 नोव्हेंबर 2008 रोजी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत दाखल झाले.
  • सुमारे 77 दिवसांचा कालावधी लागला.

चांद्रयान-2

  • त्यानंतर 22 जुलै 2019 चांद्रयान-2 मोहीम सुरु झाली.
  • 6 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम लँडर वेगळा होऊन चंद्रावर लँड होण्यासाठी सज्ज झाला.
  • चंद्रयान-2 मोहिमेला 48 दिवस लागले होते. पण, नंतर त्याचा संपर्क तुटला आणि ही मोहिम अयशस्वी ठरली.

चंद्रयान-3

  • 2023 म्हणजे चालू वर्षात नव्या उमेदीने चंद्रयान-3 चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झाले.
  • 14 जुलै दुपारी 2.35 वाजता चंद्रयान-3 चंद्राच्या दिशेने झेपावले.
  • 5 ऑगस्ट रोजी लॅण्डरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि चंद्रयान-3 लँडिंगसाठी सज्ज झाले आहे.
  • चंद्रावर पोहोचण्यासाठी चंद्रयान-3 ला 40 दिवस लागतील
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.