भारतच नाही तर ‘हे’ देशही करताहेत धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी!

98

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे आवाहन केले होते. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले की, महाराष्ट्र काही दिवसांत धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरला परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतात लाऊडस्पीकरच्या वापरावरून वाद सुरूच असून महाराष्ट्रापासून ते उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांतही यावरून वाद  होत आहेत. मात्र लाऊडस्पीकर बंदीची मागणी करणारा केवळ भारत हा देश एकटा नाही तर असे अनेक देश आहेत, जिथे धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी केली जात आहे.

‘या’ देशांतही लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी

लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करत अनेक मार्गदर्शक तत्वे याआधीच जाहीर केली होती. मात्र आता पुन्हा लाऊडस्पीकरचा मुद्दा राज ठाकरेंनी उचलून धरला आहे त्यामुळे भारतात लाऊडस्पीकरचा वाद पेटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातील कासगंज आणि अलीगढसह इतर अनेक शहरांमध्ये धार्मिक स्थळांवर यावरून वाद निर्माण होत आहेत. मात्र, केवळ भारत हा एकच देश नाही जिथे लाऊडस्पीकरबाबत वाद होत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. इतर अनेक देशांमध्ये लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियमसह इतर अनेक देशांमध्ये धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर वाजवण्यास मर्यादा घालण्यात आल्या आहेत. नायजेरियामध्ये, काही शहरांमध्ये मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी आहे.

या देशात लाऊडस्पीकर वापरण्याबाबत मार्गदर्शक तत्वे

इंडोनेशिया

इंडोनेशियामध्ये मुस्लीम धर्मीय लोकांची संख्या सर्वाधिक असून येथेही धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा सर्वाधिक वापर पर्यावरणासाठी धोकादायक आहे. त्याच्या वापराबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहे

ब्रिटन

ब्रिटनमध्ये 2020 मध्ये, वॉल्थम फॉरेस्ट कौन्सिल, लंडनने 8 मशिदींना रमजानच्या काळात त्यांच्या नमाजचे आवाहन सार्वजनिकपणे प्रसारित करण्याची परवानगी दिली. यानंतर, लंडन शहरातील आणखी अनेक मशिदींना त्यांच्या नमाजाचे आवाहन सार्वजनिकपणे प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आली.

अमेरिका

अमेरिकेतही धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरवरून वाद निर्माण झाला आहे. 2004 मध्ये, अमेरिकेतील मिशिगनमधील हॅमट्रॅक येथील मशिदीच्या वतीने अजान प्रसारित करण्यासाठी लाऊडस्पीकरची परवानगी मागितली गेली. त्यामुळे अनेक बिगर मुस्लिम रहिवाशांना त्रास सहन करावा लागला.

सौदी अरेबिया

सौदी अरेबियाने रमजानच्या काळात मशिदींमधील लाऊडस्पीकरच्या आवाजावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. तसेच स्पीकरचा आवाज एक तृतीयांश पेक्षा जास्त नसावा. प्रार्थनेसाठी पहिल्या (अजान) आणि दुसऱ्या (इकामा) साठी बाह्य लाऊडस्पीकरचा वापर मर्यादित असणे अनिवार्य आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.