LIC ची ‘ही’ बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार!

125

भारतीय आयुर्विमा महामंडळाने बंद झालेल्या वैयक्तिक विमा पॉलिसींना पुनरूज्जीवित करण्याची संधी दिली आहे. या मोहिमेला सुरूवात झाली असून एलआयसीने सांगितले की, ULIPs वगळता सर्व एलआयसी पॉलिसी विलंब शुल्क माफ करून विशेष मोहिमेंतर्गत पुनरूज्जीवित केल्या जाऊ शकतात. ज्या पॉलिसीधारकांना काही कारणास्तव प्रीमियम भरता आला नाही आणि ज्यांची पॉलिसी बंद करण्यात आली त्यांच्या फायद्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – जखमी गोविंदांवर मोफत उपचार! शासकीय, पालिका रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांचे आदेश)

मिळालेल्या माहितीनुसार, ही मोहीम १७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणार आहे. पॉलिसी पहिल्या प्रीमियममध्ये डिफॉल्ट झाल्याच्या तारखेपासून ५ वर्षांच्या कालावधीत सुरू केली जाऊ शकते. एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार, १ लाख रूपयांपर्यंतच्या एकूण प्रीमियमसाठी विलंब शुल्कात २५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

यासह सूट मर्यादा २ हजार ५०० रूपये आहे. तर १ ते ३ लाख रूपयांच्या प्रिमियमसाठी कमाल सूट ३ हजार रूपये आहे. त्याचप्रमाणे ३ लाख रूपयांपेक्षा जास्त प्रीमियमवर ३ हजार ५०० रूपयांच्या कमाल सवलतीसह विलंब शुल्कात ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. ULIPs प्लॅन वगळता सर्व पॉलिसी विलंब शुल्क माफ करून विशेष मोहिमेंतर्गत पुनरूज्जीवित केल्या जाऊ शकतात. प्रीमियम भरू न शकलेल्या पॉलिसीधारकांच्या फायद्यांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.