LCA Mark 1A : वायूदल खरेदी करणार ‘एलसीए-मार्क 1-ए’ लढाऊ विमाने

‘एलसीए-मार्क 1-ए' ही तेजसची प्रगत आवृत्ती आहे

139
LCA Mark 1A : वायूदल खरेदी करणार 'एलसीए-मार्क 1-ए' लढाऊ विमाने

भारतीय हवाई दल 100 मेड-इन-इंडिया ‘एलसीए-मार्क 1-ए’ (LCA Mark 1A) लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी स्पेन दौऱ्यावर असताना याबाबत घोषणा केली. ‘एलसीए-मार्क 1-ए’ ही तेजस विमानाची प्रगत आवृत्ती आहे. ही विमाने अपग्रेडेड एव्हीओनिक्स आणि रडार सिस्टमने सुसज्ज आहेत. हवाई दलाने यापूर्वीच 83 एलसीए मार्क-1ए विमानांची ऑर्डर दिली आहे.

भारतीय वायुसेना लवकरच मिग-21 हे जुने विमान निवृत्त करणार आहे. त्याऐवजी आता ‘एलसीए-मार्क 1-ए’ (LCA Mark 1A) ही विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. या कराराचा अधिकृत प्रस्ताव संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा भागधारकांना पाठवण्यात आला आहे. हवाई दल प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर आणखी 100 ‘एलसीए-मार्क 1-ए’ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत (LCA Mark 1A) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) अधिकारीही सहभागी झाले होते. हा करार पूर्ण झाल्यानंतर, पुढील 15 वर्षांत भारताकडे 40 एलसीए तेजस, 180 एलसीए मार्क-1ए पेक्षा जास्त आणि किमान 120 एलसीए मार्क-2 विमाने असण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी, भारताने 83 एलसीए मार्क-1ए विमानांची ऑर्डर दिली होती, जी फेब्रुवारी 2024 मध्ये वितरित केली जाऊ शकतात. ‘एलसीए-मार्क 1-ए’ ची 65 टक्क्यांहून जास्त उपकरणे भारतात बनवली जातात. एरोस्पेसमध्ये भारताच्या आत्मनिर्भरता आणि मेक-इन-इंडियाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : पत्रकारांवर बहिष्कार ही विरोधकांची राजेशाही प्रवृत्ती; बावनकुळे यांची विरोधकांवर टीका)

एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी (LCA Mark 1A) सी-295 ट्रान्सपोर्ट प्लेन घेण्यासाठी स्पेनला गेले आहेत. येथे त्यांना 13 सप्टेंबर रोजी पहिले C-295 वाहतूक विमान मिळाले. गेल्या तीन दशकांपासून सेवेत असलेल्या एव्ह्रो-748 या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टच्या जागी हे विमान आणले जात आहे.

हे विमान (LCA Mark 1A) 25 सप्टेंबर रोजी गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट केले जाईल. त्यानंतर ते आग्रा एअरबेसवर तैनात केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-295 विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आग्रा येथील प्रशिक्षण केंद्रही पुढील वर्षी तयार होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.