Kirpal Singh : UNESCO च्या जागतिक धर्म फेलोशिपचे अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरु किरपाल सिंह

137
Kirpal Singh : UNESCO च्या जागतिक धर्म फेलोशिपचे अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरु किरपाल सिंह
Kirpal Singh : UNESCO च्या जागतिक धर्म फेलोशिपचे अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरु किरपाल सिंह

किरपाल सिंग यांचा जन्म फळणीपूर्वी भारतात असलेल्या पंजाबमधील (Punjab) सय्यद कारसन येथे झाला, हा भाग सध्या पाकिस्तानात आहे. शिक्षणासाठी ते लाहोरमध्ये राहिले आणि शिक्षण पूर्ण करून लष्करी खात्यांचे उपनियंत्रक म्हणून उच्च पदावर विराजमान झाले. ते जागतिक धर्म फेलोशिपचे (World Religions Fellowship) अध्यक्ष होते. ही UNESCO द्वारे मान्यताप्राप्त संस्था आहे. या संस्थेमध्ये मध्ये जगातील सर्व प्रमुख धर्मांचे प्रतिनिधी होते. (Kirpal Singh)

(हेही वाचा – Maldives President Mohamed Muizzu : आमच्या सार्वभौमत्वात कोणाला हस्तक्षेप करू देणार नाही; मुइज्जू पुन्हा बरळले)

ग्रंथाचा असंख्य भाषांमध्ये अनुवाद

१९३० सालच्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या अध्यात्मिक कार्याला सुरुवात केली, यामध्ये त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा आणि त्यांच्या गुरुंनी लिहिलेल्या गुरमत सिद्धांताचा समावेश होता. ते मंत्रालयात कार्यरत होते, त्या काळात त्यांनी अनेक पुस्तके आणि परिपत्रके प्रकाशित केली होती. याचे असंख्य भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत.

सुरत शब्द योगाची शिकवण

आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक आध्यात्मिक प्राप्तीचा मार्ग खुला करण्यासाठी त्यांनी सुरत शब्द योगाची शिकवण दिली. अंतरात्म्यातील प्रकाश आणि आवाजाची व्याप्ती विकसित करण्यासाठी आपला ज्ञानचक्षु किंवा तृतीय नेत्र उघडणे हा या मूलभूत शिकवणीचा उद्देश आहे. यालाच अभिव्यक्तीमध्ये येणाऱ्या अप्रकट देवत्वाची शक्तीदेखील मानली जाते. या चेतानाशक्तीला जगातील वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये नाम, शब्द, ओम आणि इतर नावांनी ओळखले जाते. किरपाल सिंग यांनी म्हटले आहे की, दैवी शब्दावर ध्यान करण्याचा सराव किंवा ध्वनी प्रवाहाचा योग (सुरत शब्द योग) हा सर्व धर्मांचा आध्यात्मिक पाया आहे.

तरुणपणापासूनच किरपाल सिंग यांना आपल्या आंतरिक दृष्टीचे अनुभव आणि इतर घडलेल्या घटनांचे पूर्वज्ञान व्हायला लागले होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सूफी संत, योगी तसेच गूढवाद्यांकडून मार्गदर्शन घेतले खरे, पण त्यांच्यापैकी कोणाचाही गुरु म्हणून स्वीकार केला नाही. तरीसुद्धा हयात असलेल्या गुरूंकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी आपली आध्यात्मिक साधना आणि प्रार्थना तशीच सुरू ठेवली. १९१७ साली या साधनेचं अध्यात्मिक रूप दिसायला लागलं.

(हेही वाचा – Lok Sabha Elections: निवडणूक प्रचारात मुलांचा वापर करू नका, निवडणूक आयोगाने अॅडव्हायझरीत म्हटले…)

हजूर महाराज सावन सिंगजी यांचे शिष्यत्व

१९२४ साली ते बियास येथील प्रसिद्ध संत ‘हजूर महाराज सावन सिंगजी’ यांना त्यांच्या बियास नदीच्या काठावरील आश्रमात भेटले. हजूर यांनी किरपाल सिंग यांना सूरत शब्द योगाची शिकवण देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून किरपाल सिंग यांनी त्यांचं जीवन आपल्या आध्यात्मिक गुरुच्या उद्देशासाठी आणि त्यांच्या साधनेसाठी समर्पित केलं. या सर्व घटना घडताना ते गृहस्थाश्रमाच्या अवस्थेत होते. बाबा सावन सिंहजी महाराज यांनी किरपाल यांना दररोज सहा-तास ध्यान करण्यास सांगितले होते. त्यांच्या आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांनी कायमच आपल्या गुरूंचा आदेश शिरोधार्य मानला. जेव्हा केव्हा हजूर यांना विचारले जाई की, त्यांचा कोणी शिष्य आहे का ज्याने खूप प्रगती केली आहे? तेव्हा तेव्हा त्यांनी किरपाल सिंग (Kirpal Singh) यांचा उल्लेख केला आहे.

पंजाबी आणि उर्दू भाषांमध्ये आध्यात्मिक लिखाण

आपल्या गुरुंच्या प्रेरणेने किरपाल यांनी पंजाबी आणि उर्दू भाषांमध्ये “गुरमत सिद्धांत” (“द फिलॉसॉफी ऑफ द मास्टर्स”, The Philosophy of the Masters) या दोन खंडांचे आध्यात्मिक लिखाण करण्यास सुरुवात केली. हजूर महाराज सावन सिंग यांच्या नावाने ते प्रकाशित करण्यात आले होते. १९६० सालच्या दशकात ते इंग्रजी भाषेत पाच खंडांमध्ये प्रकाशित झाले. तसेच रुहानी सत्संगाने किरपाल सिंग यांच्या नावाखाली अनेक पुस्तके प्रकाशित केली, जी मूलत: गुरुमत सिद्धांताचाच भाग होती.

१२ ऑक्टोबर १९४७ रोजी सकाळी, हजूर महाराज सावन सिंह जी यांनी त्यांचे शिष्य किरपाल सिंह यांच्याकडे त्यांचे आध्यात्मिक कार्य चालू ठेवण्याचे काम सोपवले. हजूर महाराज सावन सिंह जी यांचे अल्पशा आजाराने २ एप्रिल १९४८ रोजी निधन झाले. आपल्या गुरुंच्या निधनानंतर किरपाल हे हिमालय पर्वताच्या पायथ्याशी ऋषिकेश या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी पुढचे पाच महिने देवमध्ये लीन होऊन जवळजवळ सतत समाधी अवस्थेत घालवले.

तीव्र ध्यानाच्या या कालावधीच्या शेवटच्या काळात, किरपाल सिंग यांना आपल्या गुरुंकडून एक आंतरिक आज्ञा मिळाली. “जगात परत या आणि माझ्या मुलांना माझ्याकडे परत आणा.” तेव्हा ते दिल्लीला गेले, तिथे भारत-पाकिस्तानच्या फाळणीमुळे पंजाबमधील लोक आश्रय शोधत होते. या ठिकाणी त्यांचे आध्यात्मिक आणि मानवतावादी कार्य सुरू झाले. आजही किरपाल यांचे ८०,००० पेक्षा जास्त अनुयायी आहेत. (Kirpal Singh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.