Kalyan Swagat Yatra : डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह; पालखी सोहळ्याला वकील उज्वल निकम यांची विशेष उपस्थिती

नवीन विचारांची नवीन धोरणांची गुढी उभारली पाहिजे असे सांगत गुढीपाडव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

109
Kalyan Swagat Yatra : डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह; पालखी सोहळ्याला वकील उज्वल निकम यांची विशेष उपस्थिती

डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या फडके गणेश मंदिराचे यंदा १००वे वर्ष आहे. यावर्षी नववर्षी शोभायात्रेचे आयोजन करण्याचे २६वे वर्ष आहे. गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवलीतून रोवली गेली. त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागतयात्रेची परंपरा सुरू झाली. डोंबिवलीच्या स्वागतयात्रेची राज्य नव्हे, तर देशभरात उत्सुकता असते. (Kalyan Swagat Yatra)

मंगळवारी सकाळीच गणेश पूजा झाल्यानंतर फडके गणपती मंदिरातून पालखी बादशाहा मैदानाच्या दिशेने निघाली. ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची या पालखी सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली. हे या पालखी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवीन विचारांची नवीन धोरणांची गुढी उभारली पाहिजे असे सांगत गुढीपाडव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

(हेही वाचा – Shops : दुकान आणि कंपन्यांचे नामफलक मराठीत नाही, तर मग भरा दुप्पट मालमत्ता कर)

नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन…
पुढे बोलताना निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक नागरिकांना महत्त्वाचा नागरिक बजावला पाहिजे. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे असं आवाहन केले आहे. यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथसाठी रामराज्य व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये हा विषय देण्यात आलाय. या स्वागतयात्रेत ६५ पेक्षा जास्त चित्ररथ आणि त्याहून जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत. लोकशाही सुदृढ निरोगी असण्याकरिता प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्का बजावायला हवा. नागरिकांनी देश बलवान करण्यासाठी मतदान करण्याचा संदेश ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी दिला.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.