Joseph Stiglitz : कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ञ जोसेफ स्तिगलित्झ

160
Joseph Stiglitz : कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ञ जोसेफ स्तिगलित्झ
Joseph Stiglitz : कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ञ जोसेफ स्तिगलित्झ

जोसेफ स्तिगलित्झ यांचा जन्म गॅरी, इंडियाना येथे ९ फेब्रुवारी येथे एका ज्यू कुटुंबात झाला. त्याची आई शार्लोट ही एक शालेय शिक्षिका आणि वडील नॅथॅनियल डेव्हिड स्तिगलित्झ (Nathaniel David Stiglitz) हे एक विमा सेल्समन होते. जोसेफ स्तिगलित्झ (Joseph Stiglitz) हे एक अमेरिकन न्यू केनेशियन अर्थशास्त्रज्ञ, सार्वजनिक धोरण विश्लेषक आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. विशेष म्हणजे त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल मेमोरियल पारितोषिक (Nobel Memorial Prize) मिळाले आहे आणि जॉन बेट्स क्लार्क पदक देखील मिळाले आहे.

(हेही वाचा – Bharat Ratna : डॉ. एम. एस. स्वामिनाथन, माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव आणि चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर)

लोकशाही आयोगाच्या २५ प्रमुख व्यक्तींमधील एक

अर्थतज्ञ म्हणून त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. ते जागतिक बँकेचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. ते आर्थिक सल्लागार परिषदेचे ते माजी सदस्य आणि अध्यक्ष देखील आहेत. २०११ मध्ये, टाईम मासिकाने स्तिगलित्झ यांची जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नोंद केली. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने सुरू केलेल्या माहिती आणि लोकशाही आयोगाच्या २५ प्रमुख व्यक्तींमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.

जागतिकीकरणाच्या संकटाची जाणीव

ओपन सिलॅबस प्रोजेक्टनुसार, अर्थशास्त्र अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयीन स्तरावर लेखक म्हणून त्यांचे नाव सर्वाधिक वेळा घेतले गेले आहे. यामध्ये त्यांचा क्रमांक पाचवा आहे. पीपल, ‘पॉवर आणि प्रॉफिट’, ‘द युरो: हॉऊ अ कॉमन करन्सी थ्रेटन्स द फ्युचर ऑफ युरोप’, ‘द ग्रेट डिव्हाईड: अनैक्वल सोसायटीज आणि वॉट वुई कॅन डू अबाउट देम’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात माहितीचा समतोल नसल्यामुळे जागतिकीकरणाच्या संकटाची जाणीव त्यांनी आधीच करून दिली होती. त्यांनी अनेक घटकांवर टीका केल्यामुळे त्यांची कारकीर्द जशी यशस्वी आहे, तशी वादग्रस्तही आहे. (Joseph Stiglitz)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.