Janseva Bank चा २३वा वर्धापन दिन संपन्न

125
जनसेवा बँकेच्या (Janseva Bank) चारकोप येथील शाखेचा २३वा वर्धापन दिन सोमवार, ३ जून रोजी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. या बँकेचा ९०० कोटी रुपये एकत्रित उलाढाल आहे.
या बँकेच्या (Janseva Bank) वर्धापन दिनाच्या दिवशी ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर, माजी नगरसेवक श्रीकांत कवठणकर, बँकेचे संचालक श्याम सुंदर डोंगरे, स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष दशकांत राणे, शाखेच्या व्यवस्थापिका लक्ष्मी झोरे, महेश राऊत, रोशन कोळेकर, चेतना भट आणि सुनील अंकम यांच्यासह सभासद उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रात जनसेवा बँकेने विविध सुविधा आणि आधुनिक पद्धतीच्या सेवा या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे. बँकेने मोठ्या प्रमाणात कर्जांचे वितरण केले आहे, तसेच (Janseva Bank) मोठ्या संख्येने बचत खात्यांच्या माध्यमातून बँकेने खातेदारांचा विश्वास संपादित केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.