Jammu Kashmir : राजौरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच

92
Jammu Kashmir : राजौरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) राजौरीत बुधवारी (२२ नोव्हेंबर) सकाळपासून सुरू असलेली चकमक सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी कायम आहे.

याठिकाणी जिहादी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये बुधवारी चकमक सुरू झाली. यामध्ये सैन्याच्या चार जवानांना हौतात्म्य आले असून कॅप्टन शुभम, मेजर एमव्ही प्रांजिल आणि हवालदार माजिद यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : हमासने रुग्णालयाच्या तळाशी बांधले भुयार; इस्रायल लष्कराने जारी केला व्हिडीओ)

या भागात काही दहशतवादी (Jammu Kashmir) लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलीस, लष्कराचे जवान आणि सीआरपीएफच्या जवानांनी या परिसरात संयुक्त शोध मोहिम सुरु केली. याचवेळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात २ अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्यानं ते गंभीररित्या जखमी झाले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

अजूनही या भागात गोळीबार सुरु असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची कुमक बोलवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Israel Hamas War : 10 नवीन ओलिसांना सोडल्यास एक दिवसाचा युद्धविराम)

पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अनेकदा घडले आहे. दहशतवादी भौगोलिक स्थिती आणि घनदाट जंगलांचा फायदा घेत भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. गेल्या आठवड्यात राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.