जे. जे. रुग्णालय मुंबई येथे परिचारिका सप्ताह 6 मे 2022 ते 12 मे 2022 या कालावधीत साजरा केला जात आहे. 6 मे 2022 रोजी आधुनिक परिचारिका सेवेच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिचारिका सप्ताहाला दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. यानिमित्त जे.जे. रूग्णालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान आयोजिन करण्यात आले असून हा सप्ताह परिचारिका व्यवसायाला समर्पित असणार आहे. याकरता प्राचार्य डॉक्टर अपर्णा संखे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच इतर शिक्षकांचेही मार्गदर्शन लाभले.