Israel Hamas War : गाझामध्ये असो वा बाहेर आम्ही हमासचा नाश करूच; पंतप्रधान नेतान्याहू आक्रमक

116
Israel Hamas War : गाझामध्ये असो वा बाहेर आम्ही हमासचा नाश करूच; पंतप्रधान नेतान्याहू आक्रमक

हमास आणि इस्त्रायल युद्धाला (Israel Hamas War) आज म्हणजेच गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी २० दिवस झाले आहेत. पण, अद्यापही इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, सर्वत्र मृतदेह विखुरले गेले, मालमत्तेचे नुकसान झाले, कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

अशातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा पट्टीत हमासच्या सुरू असलेल्या बॉम्बहल्ला दरम्यान पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. हमासचे सर्व सदस्य मृत्यूच्या जवळ आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. बुधवारी (२५ ऑक्टोबर) राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले की, “हमासचा खात्मा करणे आणि ओलीस ठेवलेल्या लोकांना मायदेशी आणणे हे इस्रायलचे मुख्य ध्येय आहे.”

(हेही वाचा – One Nation, One Election : उच्चस्तरीय समिती आणि विधी आयोगाच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’चा रोड मॅप सादर)

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नेत्यानाहू ?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासबरोबरच्या संघर्षादरम्यान “देशाचे संरक्षण करणे” हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे व्यक्त केले आणि हमासचा नायनाट करण्यासाठी जमिनीवरील मोहीम “लवकरच सुरू होईल” असे संकेत देखील दिले.

नेतान्याहू राष्ट्राला संबोधित करताना म्हणाले, “आपण आपल्या अस्तित्वाच्या मोहिमेच्या मध्यभागी आहोत. आम्ही युद्धासाठी दोन उद्दिष्टे ठेवली आहेत, एक हमासची लष्करी आणि सरकारी क्षमता नष्ट करून त्याचा नायनाट करणे आणि दुसरं म्हणजे आमच्या अपहरणकर्त्यांना घरी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. हमासचे सर्व सदस्य नश्वर आहेत-जमिनीच्या वर, जमिनीखाली, गाझाच्या आत, गाझाच्या बाहेर आम्ही त्यांचा नाश करू.

आपल्या डोळ्यांसमोर फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे देशाला वाचवणे म्हणजे ‘विजयाची प्राप्ती’.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.