Israel-Hamas War: युद्धविरामातील अडथळे दूर करण्यासाठी इजिप्शियन अधिकारी तेल अवीवमध्ये दाखल

124
Israel-Hamas War: युद्धविरामातील अडथळे दूर करण्यासाठी इजिप्शियन अधिकारी तेल अवीवमध्ये दाखल
Israel-Hamas War: युद्धविरामातील अडथळे दूर करण्यासाठी इजिप्शियन अधिकारी तेल अवीवमध्ये दाखल

इस्रायल आणि हमासमध्ये (Israel-Hamas War) अजूनही घनघोर युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही देशांतील हजारो लोकांचा बळी गेला आहे. मागील ९६ तासांत गाझा पट्टीवर इस्त्रयलींनी केलेल्या हल्ल्यात २ इस्त्रायली ओलिस ठेवलेल्या नागरिकांचा मृत्यू झाला असून ८ नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

याबाबत हमासचे कमांडर विंग अल कसम ब्रिगेड यांनी रविवारी टेलिग्राम या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या घटनेबाबत माहिती दिली. समाचार एजन्सी रॉयटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘गंभीररीत्या जखमी झालेल्या नागरिकांना योग्य उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत तसेच हे नागरिक गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावत चालली आहे. इस्त्रायलकडून या जखमी नागरिकांची काळजी घेत आहे.’

(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi : आम्हाला बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवले; रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर सवाल )

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी रफाहमधून नागरिकांना बाहेर काढून हमासवर हल्ला करण्याच्या दुहेरी योजनेची घोषणा झाल्यापासून तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच जवळजवळ १२ लाखांच्या आसपास नागरिक येथे अडकले आहेत.

इजिप्शियन उच्चस्तरीय शिष्टमंडळ इस्रायलमध्ये पोहोचले
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध थांबावे आणि ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका व्हावी, याकरिता इजिप्शियन अधिकारी तेल अविवमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायल संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी याबाबत सांगितले की, इजिप्शियन उच्चस्तरीय शिष्टमंडळ इस्रायलमध्ये पोहोचले असून आयडीएफने (Israel Defense Forces) रफाहमध्ये राहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.