Israel and Hamas Conflict: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू, इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील, सौदी अरेबियाचा इशारा

अमेरिका आणि इस्रायलच्या अनेक मित्रराष्ट्रांनी इस्रायलला इशारा दिला आहे की, सध्याच्या परिस्थितीत रफाहमधील हल्ला विनाशकारी ठरेल.

207
Israel and Hamas Conflict: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू, इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील, सौदी अरेबियाचा इशारा
Israel and Hamas Conflict: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू, इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील, सौदी अरेबियाचा इशारा

अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि हमास (Israel and Hamas Conflict) यांच्यातील युद्ध सुरू आहे. युद्धविरामाबाबत वाटाघाटी सुरू असल्या तरीही हे युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे. युद्धादरम्यान इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सौदी अरेबियाने इस्रायलला दिला आहे. शनिवारी इस्रायलने दक्षिण गाझाच्या रफाह शहरावर हल्ला केल्यास गंभीर परिणामांचा इशारा देण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक निवेदन जारी करून रफाहमधील नागरिकांना जबरदस्तीने बाहेर काढल्याबद्दल तीव्र निषेध केला आणि त्वरित युद्धबंदीची मागणी
केली आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (Ministry of External Affairs) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलकडून आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे घोर उल्लंघन होत आहे. दक्षिणेकडील रफाह शहर इजिप्तच्या सीमेवर आहे. गाझाच्या इतर भागातून पळून जाण्यास भाग पाडल्या गेलेल्या लाखो नागरिकांसाठी रफाह हे शेवटचे आश्रयस्थान आहे. गाझा पट्टी उत्तर आणि पूर्वेला इस्रायलच्या सीमेवर आहे. पश्चिमेकडे समुद्र आहे. मानवतावादी आपत्ती निर्माण होण्यापासून रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला तात्काळ बोलावण्याची आवश्यकता असल्याची बोलणी सुरू आहेत.

(हेही वाचा –Aaditya Thackeray : “तुम्हाला पंतप्रधान बनायचं असेल तर तुम्ही भाजपमध्ये जा”; आदित्य ठाकरेंचा राहुल गांधींना अजब सल्ला )

इस्रायलचा पराभव होण्याची इच्छा व्यक्त
7 ऑक्टोबरच्या हल्ल्यांनंतर इस्रायलने उत्तरेकडील भागातून हवाई हल्ल्यात 28 जणांचा बळी घेतला. इस्रायली आक्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे सुरूच आहे. इस्रायली हवाई हल्ल्यात शनिवारी सुमारे 28 पॅलेस्टिनी मारले गेले. प्रत्येक हल्ल्यात 10 मुलांसह तीन कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले. इस्रायली पंतप्रधानांनी आता सौदीच्या इशाऱ्याला प्रतिसाद दिला असून इस्त्रायलचा पराभव व्हावा, असे त्यांचा म्हणणे आहे.

बेंजामिन नेत्यनाहू यांचे प्रत्युत्तर
मात्र याला बेंजामिन नेत्यनाहू (Benjamin Netyanahu) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ‘ज्यांची रफाहमधील ऑपरेशन थांबावे, असे वाटते त्यांना आम्ही ठणकावून सांगतो की, आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. रफाह हा गाझामधील इस्रयलचा शेवटचा उरलेला बालेकिल्ला आहे, मात्र १० लाखांहून जास्त लोकांनी तिथे आश्रय घेतला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या अनेक मित्रराष्ट्रांनी इस्रायलला इशारा दिला आहे की, सध्याच्या परिस्थितीत रफाहमधील हल्ला विनाशकारी ठरेल.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.