Instagram : इंस्टाग्राममधील टेम्प्लेट ब्राऊझरच्या नव्या फीचरने घातला धुमाकूळ; जाणून घ्या वैशिष्ट्ये

156

भारतात तसेच जगभरात वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया ऍप्सपैकी इंस्टाग्राम हे सध्या एक नंबरचे ऍप आहे. याचा संपूर्ण कारभार मेटा कंपनी सांभाळते. हल्लीच मेटा कंपनीने आपल्या युजर्सना इंस्टाग्रामवर आणखी चांगला अनुभव घेता यावा याकरिता टेम्प्लेट ब्राऊझ नावाचे नवीन फीचर लॉन्च केले आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप असे ऍप्स जगावर राज्य करीत आहेत. या ऍप्सशिवाय लोक जगू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांना गुंतवून ठेवायला हे ऍप्स नवनवीन फीचर्स काढत राहतात. इंस्टाच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना इंस्टाग्रामवर ज्या प्रकारच्या रिल्स बनवायच्या आहेत त्याप्रकारच्या रिल्स बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

  • इंस्टाग्रामवर टेम्प्लेट ब्राऊझरपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात आधी होम पेज वरून क्रिएट बटनवर टॅप करा.
  • त्यानंतर रिल्सवर टॅप करा. मग तुमची कॅमेरा गॅलरी उघडण्यासाठी खालच्या बाजूला असलेल्या बटनावर टॅप करा.
  • आता टेम्प्लेटवर टॅप करा.
  • त्यानंतर तुम्ही क्रियेटर कॅमेरा आयकॉनवर टॅप करून रिल्स टॅबच्या माध्यमातून टेम्प्लेट ब्राऊझरही शोधू शकता.

हे ब्राऊझर इंस्टाग्राम युजर्सना इतर रिल्समधून टेम्प्लेट उधार घेण्याची अनुमातीही देते. हे युजर्सना ब्राऊझ करताना फार इंटरेस्टिंग वाटते. त्यासाठी तुम्ही ‘युज टेम्प्लेट’ बटनावर क्लिक करू शकता. तसेच ‘टेम्प्लेट बाय’ बटनावर क्लिक करून तुम्ही इतर युजर्सनी त्या टेम्प्लेटचा कसा उपयोग केला आहे तेही तुम्ही पाहू शकता. तर आम्ही तुम्हाला या फीचर्सची माहिती दिलेली आहे. तुम्ही या फीचर्सचा नक्कीच आनंद घ्या.

(हेही वाचा NCP : महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात राष्ट्रवादी फुटली, सर्व आमदार अजित पवारांकडे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.